Coconut Malai : तुम्हीही नारळाचं पाणी प्यायल्यानंतर ते फेकून देता? आतल्या मलईचे फायदे ऐकून चकित व्हाल!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Coconut Malai Benefits : आरोग्य तज्ञांच्या मते, नारळाच्या आत असलेली मऊ मलई देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यात शरीराला अर्जा आणि पोषण देणारे अनेक आवश्यक घटक असतात.
मुंबई : उन्हाळ्यात नारळाचं पाणी पिणं हा अतिशय कमाल अनुभव असतो. तुम्हाला तहाण लागलेली असेल आणि थंडगार नारळपाणी प्यायला मिळालं तर तो अनुभव अप्रतिम असतो. नारळपाणी बाजारपेठा, बस स्टँड आणि रस्त्याच्या कडेला लावलेले स्टॉल्स अशा अनेक ठिकाणी उपलब्ध असतं. हे पाणी आरोग्यदायी तर असतंच शिवाय चवदार देखील असतं. उन्हाळ्यात उष्णता वाढलेली असताना शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाचं पाणी पितात. परंतु अनेक जण पाणी प्यायल्यानंतर ते नारळ फेकून देतात आणि त्याच्या आतील मलई खात नाहीत.
आरोग्य तज्ञांच्या मते, नारळाच्या आत असलेली मऊ मलई देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यात शरीराला अर्जा आणि पोषण देणारे अनेक आवश्यक घटक असतात. ही मलई तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करू शकते. त्यामुळे तुम्ही देखील यापुढे नारळाचं पाणी प्याल, तेव्हा मलई नक्की खा.
खरगोन येथील आरोग्य तज्ञ डॉ. संतोष मौर्य (एमडी) यांनी सांगितलं की, नारळाच्या मलईमध्ये आरोग्यदायी फॅट्स, फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. याशिवाय त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात आढलतं. हे सर्व घटक शरीरातील ऊर्जा वाढवण्यास आणि स्नायू बळकट करण्यास मदत करतात.
advertisement
नारळाच्या मलईमध्ये फायबर देखील चांगल्या प्रमाणात असतं. हे फायबर तुमची पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या असतील तर नारळाच्या आतली मलई तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. नारळातील मलई पोटाला थंडावा देखील देते. यामुळं उन्हाळ्यात पोटातील जळजळ आणि आम्लपित्त यासारख्या समस्या देखील कमी होऊ शकतात.
तज्ञांच्या मते, नारळाच्या मलईमधील हेल्दी फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ही मलई शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकते. तुम्ही माफक प्रमाणात नारळाच्या मलई खाल्ली तर तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि हृदयाचं आरोग्य देखील सुधारतं. नारळाच्या मलईमधील पोषक तत्वे त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहेत. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आरोग्यदायी चरबी असते, जे त्वचेचे पोषण करतात. उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत होते.
advertisement
तज्ञ असाही सल्ला देतात की, नारळाची मलई फायदेशीर असली तरी, तिचे अतिसेवन करू नये. त्यात चरबीचे प्रमाण जास्त असते. ज्या लोकांचे वजन वाढले आहे किंवा ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी त्याचं मर्यादित प्रमाणात सेवन करावं. नारळाचं पाणी प्यायल्यानंतर त्यातील मऊ मलई चमच्याने काढून तुम्ही थेट खाऊ शकता. मलई खूपच मऊ असेल तर ती स्मूदी, शेक किंवा फ्रूट सॅलडमध्ये घालू शकता. काही लोक ती दही किंवा ओट्समध्ये मिसळून खातात. असं केल्याने तिची चव आणि पोषणमूल्ये दोन्ही वाढतात.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coconut Malai : तुम्हीही नारळाचं पाणी प्यायल्यानंतर ते फेकून देता? आतल्या मलईचे फायदे ऐकून चकित व्हाल!








