Rupali Chakankar : अशोक खरातला बेड्या, रुपाली चाकणकर 'फरार'? राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rupali Chakankar : कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. रुपाली चाकणकर या फरार असल्याचा दावा त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली. मात्र, त्याचे राज्यातील राजकारण्यांसोबत असलेल्या संबंधावरून मोठी खळबळ उडाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे त्याच्याशी चांगले संबंध असल्याच्या आरोपांचा धुरळा उडाला. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. रुपाली चाकणकर या फरार असल्याचा दावा त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
नाशिक महिला अत्याचार प्रकरणात आध्यात्मिक गुरू म्हणावला जाणारा अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे.
"रुपाली चाकणकर फरार..."
advertisement
गेल्या दोन दिवसांपासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर आलेल्या नाहीत, हाच धागा पकडत रुपाली पाटील यांनी फेसबुकवर "राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार... बजाव ताली!" अशी उपरोधिक पोस्ट केली आहे. नाशिकमधील खरात प्रकरणात चाकणकर यांचे नाव वारंवार घेतले जात असल्याने त्या जाणीवपूर्वक माध्यमांपासून दूर राहत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
advertisement
काय आहे 'कॅप्टन खरात' कनेक्शन?
अशोक खरात याने दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर या खरातची 'पाद्यपूजा' करत असल्याचा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झाल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्याशिवाय, आरोपी खरात याने स्थापन केलेल्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर यांची वर्णी लागली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 8:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rupali Chakankar : अशोक खरातला बेड्या, रुपाली चाकणकर 'फरार'? राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ









