Mumbai Local : मध्य रेल्वेवर तब्बल 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता?जाणून घ्या
Last Updated:
Central Railway Block : मुंबईकर जर तुम्हीही लोकलने दररोज प्रवास करत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अनेक लोकल रद्द होणार असून वेळापत्रकातही मोठा बदल होणार आहे.
मुंबई : मुंबईकरांनो आज आणि उद्या लोकलने प्रवास करण्यासाठी आधी ही महत्त्वाची बातमी नक्की वाचा अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेवर आजपासून 10 तासांचा ब्लॉग घेण्यात येणार आहे.
ब्लॉकमध्ये प्रवाशांची मोठी कसरत
मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर वाढत्या गर्दीमुळे 15 डब्यांची लोकल सुरु करण्याचा विचार सुरु आहे त्यामुळे लोकल थांबणे सोयीचे व्हावे यासाठी ठाणे आणि डोंबिवली स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम करण्यात येत आहे. हाती घेण्यात आलेल्या या कामामुळे शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळी अनेक लोकल ट्रेन रद्द होणार असून काही लोकल ट्रेन धीम्या मार्गाऐवजी जलद मार्गावर वळवण्यात येतील.
advertisement
जम्बो ब्लॉकचे नेमके परिणाम कसे?
दोन दिवस घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकच्या वेळी कल्याण स्थानकावरुन सुटणाऱ्या धीम्या लोकल या जलद मार्गावरुन सोडण्यात येतील. यामुळे ठाकुर्ली आणि कोपर स्थानकावर यांना थांबा नसणार. मग पुढे दिवा आणि ठाणे दरम्यान पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील. शिवाय ठाणे-मुलुंड दरम्यानही काही लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.
डोंबिवलीतून सुटणाऱ्या लोकल रद्द
1- ब्लॉक दरम्यान डोंबिवली येथे सुरु आणि समाप्त होणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात येणार असून मुलुंड-ठाणे आणि दिवा-कल्याण दरम्या अप- डाऊन सर्व उपनगरीय लोकल सेवा रद्द. त्यात शनिवारी रात्री उशिरा सुरु होत असलेल्या लोकलपासून ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत काही लोकल सेवांमध्ये बदल करण्यात आलेले आहे.
advertisement
2) कल्याणवरुन सुटणाऱ्या अप धीम्या लोकल या अप जलद मार्गावर या कालावधीत वळवण्यात येणार असून त्याच पुढे ठाणे आणि मुलुंडदरम्यान परत धीम्या मार्गावर आणल्या जातील, अशी माहिती समोर आलेली आहे.
मेल-एक्स्प्रेसचे मार्गही बदलले
ब्लॉक दरम्यान लोकल गाड्यावर परिणाम होणार असून याचा फटका मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही बसणार आहे. ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल आणि एक्स्प्रेस या विद्याविहार, ठाणे ते कल्याणदरम्या पाचव्या मार्गावरुन वळण्यात येतील. शिवाय अप दिशेने येणाऱ्या गाड्यांना कल्याण, ठाणे-विद्याविहार सहाव्या मार्गावरुन चालवण्यात येतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 8:21 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मध्य रेल्वेवर तब्बल 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता?जाणून घ्या









