बदला फोनची फक्त एक सेटिंग! कधीच हॅक होणार नाही अकाउंट, पैसे राहतील सेफ
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Android Unknown Source Setting: सध्याच्या काळात सायबर फ्रॉड खुप वाढले आहेत. ऑनलाइन बँकिंग वाढली आहे, ज्यामुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांना स्कॅम करणं सोपं झालंय. पण काही सेटिंग्सने हे आपण टाळू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ही सेटिंग ऑन असल्यास काय? : हे सेटिंग ऑन केली तर तुमचा फोन साइडलोडिंगला Allow करतो. म्हणजेज गूगल प्ले स्टोर व्यतिरिक्तही सोर्सेसने अॅप्स डाउनलोड करू शकता. लक्षात ठेवा की, हे करणं हानिकारक ठरू शकतं. साइडलोडिंगच्या अॅप्समध्ये मालवेयरचा धोका असतो. ज्यामुळे तुमच्या डिव्हाइसला टार्गेट केले जाऊ शकते. त्यामुळे, नेहमी विश्वसनीय स्रोतांकडूनच ॲप्स डाउनलोड करणे योग्य ठरते.
advertisement
या गोष्टी ठेवा लक्षात : एखादी अनोळखी व्यक्ती लिंक पाठवून अॅप डाउनलोड करण्यास सांगत असेल तर सावधान राहा. असे अॅप्स इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला 'Unknown Sources' सेटिंग ऑन करावी लागेल. ज्यामुळे मालवेयरच्या APK फाइल्स इंस्टॉल होऊ शकतात आणि तुमचा फोन मालवेयरने इंफेक्टेड होईल. यामुळे ही सेटिंग नेहमीच ऑफ ठेवा.






