advertisement

टेक ऑफ होताच एअरफोर्सचं विमान कोसळलं, 80 जवानांचा मृत्यू, कोलंबियात भीषण अपघात

Last Updated:

कोलंबियामध्ये वायूसेनेच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे, या विमानामधून 110 जण प्रवास करत होते, यापैकी 80 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

टेक ऑफ होताच एअरफोर्सचं विमान कोसळलं, 80 जवानांचा मृत्यू, कोलंबियात भीषण अपघात
टेक ऑफ होताच एअरफोर्सचं विमान कोसळलं, 80 जवानांचा मृत्यू, कोलंबियात भीषण अपघात
मुंबई : कोलंबियामध्ये वायूसेनेच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे, या विमानामधून 110 जण प्रवास करत होते, यापैकी 80 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार टेक ऑफ होताच विमानाचा अपघात झाला. कोलंबियाची लोकल न्यूज एजन्सी ब्ल्यू रेडियोने विमानामध्ये 110 सैनिक असल्याची माहिती दिली आहे. 'कोलंबियाच्या दक्षिण भागात लॉकहीड मार्टिन (LMT.N) च्या हरक्युलिसन C-130 विमानाचा अपघात झाला', असं कोलंबियाच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पेरूच्या सीमेजवळ कोलंबियाच्या दक्षिणी भागात ऍमेझॉन क्षेत्रातील प्युर्टो लेगुइजामो येथून विमानाने टेक ऑफ केलं, या विमानामध्ये सशस्त्र बलाचे सैनिकही होते, असं संरक्षण मंत्री पेड्रो सांचेज म्हणाले. पीडितांची संख्या आणि अपघाताच्या कारणाची माहिती अजून समोर आलेली नाही, असंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. या विमानात 110 सैनिक होते आणि अपघात शहराच्या केंद्रापासून फक्त 3 किमी दूर झाला.
advertisement
advertisement
याआधी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बोलिवियाई वायूसेनेचे हरक्युलिस सी-130 हे विमान राजधानी ला पाज जवळ ऑल्टो या मोठी लोकसंख्या असलेल्या शहराजवळ कोसळलं होतं. या अपघातामध्ये 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले होते.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
टेक ऑफ होताच एअरफोर्सचं विमान कोसळलं, 80 जवानांचा मृत्यू, कोलंबियात भीषण अपघात
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement