मध्य रेल्वेच्या निर्णयाचा अकोलेकर प्रवाशांना दिलासा; उन्हाळी सुट्यांचा प्रवास होणार सुखकर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढतेय. कारण लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या असतात. अशावेळी अकोलेकरांसाठी गुड न्यूज आजे कारण काही अतिरिक्त रेल्वे सोडल्या जात आहेत.
advertisement
काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून प्रवाशांची सोय पाहून उत्सवाच्या निमित्ताने विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आलेली. या अंतर्गत राजकोट–मेहबूबनगर आणि ओखा–मदुराई मार्गांवर विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला होता. होळीपासून या विशेष गाड्या सुरू आहेत, त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
advertisement
advertisement
या आहेत त्या गाड्या : लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष गाडी नंबर 01029 ही 3 एप्रिलला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 12.55 वाजता सुटेल. तसंच नागपूरमध्ये त्याच दिवशी दुपारी 3.45 वाजता पोहोचेल. गाडी नंबर 05022 विशेष गाडी 3 एप्रिल रोजी रोजी नागपूर येथून रात्री 8 वाजता सुटणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि चर्चा हे स्टॉप असतील.
advertisement
विशेष गाड्यांना 2 सेकंड क्लास एसी, 4 थर्ड एसी, 8 स्लीपर कोच, 4 जनरल 2 आणि 1 जनरल सेकंड क्लास असेल. यासह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे. विशेष गाडीसाठी आरक्षण 24 मार्च रोजी सर्व कॉम्प्यूटराइज्ड रिझर्व्हेशन सेंटरवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल, तिकिटांच्या रिझर्व्हेशनसाठी प्रवासी RailOne अॅप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या स्टॉपवरील सर्व टाइम टेबल बघायचा असल्यास www.enquiry.indianra il.gov.in या वेबसाइटवर व्हिजिट करा. यासोबतच NTES अॅप डाउनलोड करून पाहू शकता.







