advertisement

Weather Alert: धोका अजून संपला नाही! ताशी 50 किमीने वारे वाहणार, अवकाळी झोडपणार, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात दुहेरी संकटाचा धोका कायम आहे. आज पुन्हा अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत आहे. उष्णतेच्या लाटेसोबत असणाऱ्या या धोक्यामुळे नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहेत. आज, 25 मार्च रोजी पुन्हा हवामानाची विचित्र स्थिती राज्यात राहील. कुठे वादळी पाऊस, तर कुठे उष्ण आणि दमट हवामानाची लाट कायम राहील. कोकण ते विदर्भ आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/7
कोकणात आज हवामान कोरडे आणि आंशिक ढगाळ राहील. पावसाची विशेष शक्यता नाही. परंतु, मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान असेल. प्रचंड आर्द्रतेमुळे उकाडा जाणवणार असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईचे कमाल तापमान 32-34 अंशांच्या दरम्यान राहील.

3/7
मध्य महाराष्ट्रात देखील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुणे, सांगली आणि सोलापूर परिसरात आज पावसाची शक्यता आहे. विशेषतः सोलापुरात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह मध्यम पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या परिसरात हवामान कोरडे राहील. 26 मार्च रोजी मात्र सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव परिसरात वातावरण तापले आहे. आज मात्र या भागात गडगडाटी पावसाची शक्यता आहे. हवामान काही प्रमाणात ढगाळ राहील. मात्र जोरदार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

5/7
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. तर काही ठिकाणी अवकाळी संकटाचा फटका बसेल. विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत आज हवामान कोरडे आणि उष्ण राहील. तर नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल. तापमान 34-38 अंशांवर राहील.

6/7
विदर्भातून अवकाळी संकटाने माघार घेतली आहे. आता या ठिकाणी उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. आज कमाल तापमान 34-38 अंशांच्या दरम्यान राहील. हवामान मुख्यतः कोरडे राहील. परंतु, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ परिसरात वादळी पावसाची शक्यता आहे. शेती आणि बागायती क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे.

7/7
दरम्यान, 25 मार्च रोजी कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भाचा पारा 39 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती पिकांची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी आरोग्य सांभाळावे.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement