advertisement

Electricity : भारतात सर्वात आधी लाईट कोणत्या राज्यात आली, पहिल्यांदा विजेचे दिवे पाहून लोकांची प्रतिक्रिया कशी होती?

Last Updated:
भारताचा हा प्रकाशमय प्रवास नेमका कुठून सुरू झाला? कोलकात्यात पहिली वीज आली की कर्नाटकात? चला, इतिहासाची पानं उलटून पाहूया भारताच्या पहिल्या विजेच्या बल्बची गोष्ट.
1/7
आजच्या युगात आपण विजेविना जगण्याचा विचारही करू शकत नाही. मोबाईल चार्ज करण्यापासून ते रात्रीचा अंधार दूर करण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीसाठी आपण एका स्विचवर अवलंबून असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, जेव्हा भारतात पहिल्यांदा विजेचा बल्ब पेटला असेल, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील? ज्या काळात फक्त कंदील आणि मशालींचा उजेड असायचा, अशा वेळी तारांमधून वाहणारी वीज पाहून लोकांना तो एखादा चमत्कारच वाटला असेल.

2/7
भारताचा हा प्रकाशमय प्रवास नेमका कुठून सुरू झाला? कोलकात्यात पहिली वीज आली की कर्नाटकात? चला, इतिहासाची पानं उलटून पाहूया भारताच्या पहिल्या विजेच्या बल्बची गोष्ट.
भारताचा हा प्रकाशमय प्रवास नेमका कुठून सुरू झाला? कोलकात्यात पहिली वीज आली की कर्नाटकात? चला, इतिहासाची पानं उलटून पाहूया भारताच्या पहिल्या विजेच्या बल्बची गोष्ट.
advertisement
3/7
भारतात विजेचं आगमन अधिकृतपणे 1879 मध्ये झालं. पश्चिम बंगालमधील कोलकाता हे ते पहिलं शहर होतं, जिथे विजेचा पहिला व्यवहारिक प्रयोग करण्यात आला. मात्र, त्यावेळी संपूर्ण शहरात वीज नव्हती; ती केवळ काही मोजक्या ठिकाणी चाचणीसाठी वापरली गेली होती. पुढे 1881 मध्ये कोलकाता नगरपालिकेला पथदिव्यांसाठी वीज वापरण्याची परवानगी मिळाली आणि रात्रीचे रस्ते उजळून निघाले.

4/7
कोलकात्यात वीज आधी आली असली, तरी संपूर्ण शहराला विजेने उजळवून टाकण्याचं श्रेय जातं ते कर्नाटकच्या कोलार (Kolar) शहराला. त्यावेळी रॉकेलचे लॅम्प वापरणाऱ्या लोकांसाठी हा अनुभव अगदी विस्मयकारक होता. लोक रस्त्यावर उभे राहून आश्चर्याने त्या दिव्यांकडे पाहत असत.

5/7
1902 मध्ये कावेरी नदीच्या काठी शिवसमुद्रम येथे आशियातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कोलारच्या सोन्याच्या खाणींना वीज पुरवणं हा होता, जेणेकरून सोन्याचं उत्खनन वेगाने करता येईल. त्याकाळी कोलारच्या गोल्ड फील्ड्सना 'छोटा इंग्लंड' म्हटलं जायचं. कारण तिथे वीज, पाणी आणि क्लब्स यांसारख्या आधुनिक सुविधा होत्या, ज्या त्याकाळी केवळ लंडनसारख्या प्रगत शहरांमध्येच पाहायला मिळायच्या.

6/7
1899 मध्ये कलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन ची स्थापना झाली, ज्यामुळे भारताला वीज पुरवठ्याची एक अधिकृत यंत्रणा मिळाली. यानंतर 1905 मध्ये दिल्लीत विजेचं आगमन झालं आणि हळूहळू ही प्रकाशक्रांती संपूर्ण देशात पसरली. कोलकात्यात विजेचा वापर प्रामुख्याने प्रशासकीय कामांसाठी व्हायचा, तर कोलारमध्ये औद्योगिक विकासासाठी तिचा वापर झाला.

7/7
आज आपण विजेचा मुबलक वापर करतो, पण तिचं महत्त्व जपलं पाहिजे. उन्हाळ्यात एसी किंवा कुलरचा वापर करताना तो गरजेपुरताच करावा. मोठे उपकरणं वापरताना वेळापत्रक पाळावे. शक्य असल्यास घरांमध्ये 'सोलर वॉटर हीटर'चा वापर करावा, जेणेकरून आपण नैसर्गिक ऊर्जेचा वापर वाढवू शकू.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement