LPG Cylinder : घरगुती सिलिंडर 14.2 किलोचाच का असतो? काय आहे या आकड्यामागचं सिक्रेट, अनेकांना हे माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Why LPG cylinder is 14.2 kg : कधी विचार केलाय का की हा आकडा 15 किंवा 20 किलो असा 'राऊंड फिगर' देखील असू शकला असता, 14.2 किलो असा का? हा केवळ एक योगायोग नाही, तर यामागे दशकांपूर्वीचा सर्व्हे, इंजिनिअरिंगचा मेंदू आणि सामान्य माणसाची सुरक्षा असं एक मोठं विज्ञान दडलं आहे.
सकाळी उठल्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची वस्तू कोणती असेल, तर ती म्हणजे एलपीजी गॅस सिलिंडर. गॅस संपला की आपली धावपळ उडते आणि नवीन सिलिंडर आला की जीव भांड्यात पडतो. पण तुम्ही कधी बारकाईने लाल रंगाच्या त्या सिलिंडरवर नजर टाकली आहे का? तिथे गॅसचं वजन नेहमी '14.2 किलो' असंच लिहिलेलं असतं.
advertisement
कधी विचार केलाय का की हा आकडा 15 किंवा 20 किलो असा 'राऊंड फिगर' देखील असू शकला असता, 14.2 किलो असा का? हा केवळ एक योगायोग नाही, तर यामागे दशकांपूर्वीचा सर्व्हे, इंजिनिअरिंगचा मेंदू आणि सामान्य माणसाची सुरक्षा असं एक मोठं विज्ञान दडलं आहे. चला तर मग, आपल्या घरातील लाल सिलेंडर मागचं हे गुपित उलगडूया.
advertisement
advertisement
गॅस भरलेल्या सिलिंडरचे एकूण वजन (रिकाम्या टाकीचे वजन + गॅस) साधारणपणे 29.5 ते 30 किलो भरते. तज्ज्ञांना असं आढळलं की, जर गॅसचे प्रमाण 15 किलोपेक्षा जास्त केले असते, तर सिलिंडरचे एकूण वजन 35 किलोच्या पार गेले असते. अशा वेळी घराच्या पायऱ्या चढून सिलिंडर नेणे किंवा डिलिव्हरी बॉईजसाठी तो वाहून नेणे अत्यंत कठीण आणि धोकादायक ठरले असते.
advertisement
प्रेशर आणि सुरक्षेचं 'जादुई' गणितएलपीजी म्हणजेच 'लिक्विड पेट्रोलियम गॅस' हा अत्यंत ज्वलनशील असतो. उष्णता वाढली की गॅस प्रसरण पावतो, ज्यामुळे सिलिंडरच्या आतील दाब वाढतो. सुरक्षेच्या नियमांनुसार, सिलिंडरमध्ये थोडी रिकामी जागा सोडणे अनिवार्य असते, जेणेकरून प्रसरण पावणाऱ्या गॅसला जागा मिळेल. 14.2 किलो हे असं अचूक प्रमाण आहे, ज्यामध्ये गॅसचा दाब सुरक्षित पातळीवर राहतो. यापेक्षा जास्त गॅस भरल्यास सिलिंडर फुटण्याचा किंवा गॅस गळतीचा धोका वाढू शकतो. म्हणूनच इंजिनिअरिंगच्या दृष्टीने हा आकडा फ्रीज करण्यात आला.
advertisement
भारतीय कुटुंबाची गरज आणि 'रिफिलिंग' चक्रसिलिंडरची क्षमता ठरवताना केवळ वजनाचाच नाही, तर एका सरासरी भारतीय कुटुंबाच्या वापराचाही विचार केला गेला. संशोधनात असं दिसून आलं की:14.2 किलो गॅस हा 4 ते 5 सदस्य असलेल्या कुटुंबासाठी साधारणपणे 30 ते 45 दिवस पुरतो.हा काळ बुकिंग आणि रिफिलिंगच्या चक्रासाठी सर्वात सोयीचा ठरला. जर सिलिंडर छोटा असता, तर ग्राहकांना वारंवार बुकिंग करावं लागलं असतं आणि खूप मोठा असता, तर त्याची किंमत सामान्यांच्या बजेटबाहेर गेली असती.
advertisement
आज तंत्रज्ञान बदललं, सिलिंडर बनवण्याचं मटेरियल सुधारलं, तरीही 14.2 किलोचा हा स्टँडर्ड आकडा बदलण्याची गरज भासली नाही. ट्रकलोडींगपासून ते गोदामात ठेवण्यापर्यंत हा आकार सर्वात किफायतशीर आणि सुरक्षित मानला जातो. जरी आता 5 किलोचे छोटे सिलिंडर उपलब्ध असले, तरी आजही कोट्यवधी घरांचं किचन हे 14.2 किलोच्या सिलिंडरवरच टिकून आहे.





