advertisement

Success Story : कांद्याने शेतकऱ्याला बनवलं लखपती, तरुण शेतकऱ्याने पद्धत बदलली अन् 6 लाख कमावले!

Last Updated:

दोन एकर क्षेत्रात त्यांनी केलेल्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांचेही लक्ष वेधले गेले आहे. मागील काही वर्षांपासून ते कांदा पिकाची लागवड करत असले तरी यंदाचा हंगाम त्यांच्या दृष्टीने विशेष ठरला आहे.

+
News18

News18

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील तरुण शेतकरी महेश राठोड यांनी सेंद्रिय पद्धतीने कांदा लागवड करत यावर्षी उल्लेखनीय यश मिळवले आहे. दोन एकर क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या या पिकातून एका सीझनमध्ये तब्बल 5 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महेश राठोड यांनी यावर्षी प्रथमच पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांनी शेणखत, जीवामृत आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर केला. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत झाली तसेच पिकाची गुणवत्ता सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनातही समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आले. यासाठी त्यांना 25 हजार खर्च आला.
advertisement
त्यांच्या मते, सेंद्रिय शेतीमुळे सुरुवातीला काही अडचणी येतात, परंतु दीर्घकालीन फायदा नक्की मिळतो. खर्चात लक्षणीय घट झाल्याने निव्वळ नफा वाढला आहे. रासायनिक औषधांवर होणारा खर्च वाचल्यामुळे आर्थिक ताणही कमी झाला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती हा भविष्यासाठी उत्तम पर्याय असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
यावर्षी कांद्याला बाजारात चांगला दर मिळाल्याने महेश राठोड यांना अपेक्षेपेक्षा अधिक नफा झाला. उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे व्यापाऱ्यांकडूनही चांगली मागणी मिळाली. यामुळे त्यांच्या मेहनतीचे चीज झाले असून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान, महेश राठोड यांनी इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. शेतीमध्ये जर आपण योग्य नियोजन आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर केला, तर निश्चितच त्याचा फायदा होतो, असे ते सांगतात. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरात सेंद्रिय शेतीकडे वळण्याची प्रेरणा निर्माण होत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : कांद्याने शेतकऱ्याला बनवलं लखपती, तरुण शेतकऱ्याने पद्धत बदलली अन् 6 लाख कमावले!
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement