advertisement

60 एकराचा मालक भोंदू अशोक खरातचे पोलिसांनी 1 मिनिटात 12 वाजवले? 'त्या' रात्रीचा थरार समोर

Last Updated:

शेकडो महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात याच्या मुसक्या आवळण्यात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांना यश आले आहे.

News18
News18
नाशिक : नाशिकमध्ये आध्यात्मिकतेच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणाऱ्या अशोक खरात याच्या पापकर्मांचा घडा अखेर भरला आहे. 17 मार्च 2026 च्या त्या रात्री नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात जो थरार घडला त्याने सगळेच हादरले. कायद्याचा बडगा उगारत पोलिसांनी या नराधम भोंदूला रात्री 12 वाजण्यासाठी अवघा 1 मिनिट शिल्लक असताना (23:59 वाजता) बेड्या ठोकल्या.
आध्यात्मिक शक्ती आणि मंत्र-तंत्राचा बागुलबुवा उभा करून शेकडो महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात याच्या मुसक्या आवळण्यात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांना यश आले आहे. 17 मार्च रोजी एका पीडित महिलेने धैर्याने पुढे येत दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत ही कारवाई केली. विशेष म्हणजे 17 माार्चला रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी खरातच्या हातांत बेड्या ठोकून पोलिसांनी त्याला कायद्याचा हिसका दाखवला. 12 वाजण्याअगोदर पोलिसांनी खरातचे बारा वाजवले.
advertisement

तक्रारदार महिलेने काय म्हटले आहे?

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा केला होता. ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर' येथील आपल्या कार्यालयात बोलावून त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला. धार्मिक विधीच्या नावाखाली तिला गुंगीचे पदार्थ आणि पाणी देऊन त्यांची शुद्ध हरपल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करत असे. इतकेच नव्हे तर अत्याचाराची कुठे वाच्यता केल्यास तुझे आयुष्य बरबाद करून टाकेल अशी धमकी देत आणि तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून तिच्यावर वारंवार पाशवी बलात्कार केला.
advertisement

वरिष्ठ अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये

पीडितेने आपबिती कथन करताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. बीएनएस कलम 64 (1), 74, 351(2) आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होताच, पोलिसांची पथके खरातच्या शोधात रवाना झाली. रात्रीची शांतता पसरलेली असताना पोलिसांनी खरातला घेरले आणि बरोबर 23: 59 वाजता त्याला ताब्यात घेतले.
advertisement

नाशिकमधील इतरही भोंदूंचे धाबे दणाणले

अशोक खरातने केवळ शारीरिक शोषण केले नाही, तर लोकांच्या धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांना मानसिक गुलाम बनवले होते. जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या कडक कलमान्वये आता त्याच्यावर कारवाई सुरू आहे. या अटकेमुळे नाशिकमधील इतरही भोंदूंचे धाबे दणाणले आहेत. खरातच्या शिवनिका संस्थेच्या सदस्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या संस्थेवरील सदस्यांचीही चौकशी होईल, असे सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
60 एकराचा मालक भोंदू अशोक खरातचे पोलिसांनी 1 मिनिटात 12 वाजवले? 'त्या' रात्रीचा थरार समोर
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement