advertisement

Property News: सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, मालमत्तेच्या 'फेरफार'सह ४५ कामं एका क्लिकवर, राज्य सरकारची घोषणा

Last Updated:

Property Card News: मुंबईतील ३० लाख मालमत्ताधारकांसाठी मोठी बातमी! आता प्रॉपर्टी कार्ड फेरफारसह ४५ प्रकारची कामं ऑनलाईन होणार. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, जाणून घ्या कशी आहे ही नवीन ऑनलाईन पद्धत

AI Image : सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, मालमत्तेच्या 'फेरफार'सह ४५ कामं एका क्लिकवर, राज्य सरकारची घोषणा
AI Image : सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, मालमत्तेच्या 'फेरफार'सह ४५ कामं एका क्लिकवर, राज्य सरकारची घोषणा
मुंबई: मुंबईतील जमीन आणि मालमत्ता व्यवहारांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मिळकतपत्रिकांचे (प्रॉपर्टी कार्ड) फेरफार आता पूर्णपणे ऑनलाईन होणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मालमत्ताधारकांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही.
मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संधारणाची पद्धत वेगळी असल्याने, मुंबईत संगणकीकरणात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, जनतेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने यावर कायमस्वरूपी मार्ग काढला आहे. सध्या मुंबईतील १९ महसूल विभाग आणि ४ नगररचना योजनांमधील एकूण २७,८४७ संगणकीय मिळकतपत्रिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

घरबसल्या सुविधा आणि पारदर्शकता

advertisement
या नवीन प्रणालीसाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. नागरिक आता mahabhumi.gov.in या पोर्टलवर घरबसल्या फेरफारासाठी अर्ज करू शकतील. विशेष म्हणजे, अर्जाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती अर्जदाराला मोबाइलवर मेसेजद्वारे वेळोवेळी मिळणार आहे. या पारदर्शक प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कामात मोठी गती येईल, असा विश्वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

४५ प्रकारच्या नोंदी ऑनलाईन

advertisement
मुंबईत प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. यात खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबँक, आरक्षण आणि भूसंपादन यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. नागरिकांनी आता आपल्या मालमत्तेच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात न जाता ऑनलाईन संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही सरकारने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Property News: सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, मालमत्तेच्या 'फेरफार'सह ४५ कामं एका क्लिकवर, राज्य सरकारची घोषणा
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement