Tata Sierra च्या मायलेजचं सत्य अखेर आलं समोर, RTI मध्ये आश्चर्यकारक आकडेवारी उघड
- Published by:Sachin S
Last Updated:
टाटा मोटर्सच्या शोरूमवर Tata Sierra ला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहे. Tata Sierra ही सेफ्टीच्या बाबतीत ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. पण, मायलेजच्या बाबतीत बरीच चर्चा रंगली होती.
टाटा मोटर्सने मोठा गाजावाजा करत मागील वर्षी आपली लिजेंड Tata Sierra लाँच केली होती. हटके लूक आणि दमदार परफॉर्मन्समुळे अवघ्या काही महिन्यात Tata Sierra ने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अजूनही टाटा मोटर्सच्या शोरूमवर Tata Sierra ला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहे. Tata Sierra ही सेफ्टीच्या बाबतीत ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. पण, मायलेजच्या बाबतीत बरीच चर्चा रंगली होती. अखेरीस माहितीचा अधिकाराअंतर्गत अर्थात RTI मध्ये Tata Sierra च्या मायलेजबद्दल खरं सत्य समोर आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
Tata Sierra बद्दल ARAI अर्थात (Automotive Research Association of India) ला भारतीय ऑटोमोटिव्ह संशोधन संस्थेकडून मिळालेल्या RTI च्या रिपोर्टमध्ये 1.5 लीटर TGDi Hyperion पेट्रोल इंजिन 13.5 किमी प्रति लिटर इतकं मायलेज देते. पण 1.5 लीटर क्रायोजेट डिझेल इंजिन 18.8 किमी प्रति लिटर मायलेज देत असल्याचा उल्लेख केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Tata Sierra ची आता अधिकृत मायलेजची माहिती समोर आली असली तरी विक्रीवर कोणताही परिणाम झाला नाही. Tata Sierra ची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कंपनीने अलीकडे दावा केला आहे की, लाँच झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यात ७० हजार बुकिंग झाली. तर अलीकडे आणखी 10 हजार यूनिट्सची डिलिव्हरी झाली आहे. आतापर्यंत Tata Sierra बुकिंगचा आकडा हा 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे वेटिंगची मुदत वाढली आहे.
advertisement
advertisement









