लोकसभेचा धक्कादायक निकाल लावून देतो, खरात बाबाचं आश्वासन, महिला नेता भाळली, तो CCTV पोलिसांना मिळाला!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ashok Kharat: एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत अनेक राजकारण्यांचे संबंध असल्याचे जगजाहीर झाले आहे. अशोक खरात याच्याकडे राजकारणी मंडळींच्या नियमित वाऱ्या होत असत, याचे अनेक फोटो समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहे. आपल्याकडे दिव्यशक्ती असून सगळ्यांच्या अडीअडचणींवर उपाय असल्याचा दावा खरात करीत असे. त्याच्या संमोहनाने सुशिक्षित अडाणी लोकही त्याच्या जाळ्यात फसले. लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्रातील एक महिला खासदारानेही कॅप्टनच्या दरबारात जाऊन आपला हात दाखवून भविष्य जाणून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. धक्कादायक निकाल लावून देतो, असे म्हणत संबंधित महिला उमेदवाराला, पुढे ज्या लोकसभेच्या खासदारही झाल्या, त्यांना पूजा करण्यास खरातने भाग पाडल्याचा दावा सूत्रांनी केला. निवडणुकीत यशासाठी त्या खरातकडे गेल्याची सूत्रांची माहिती आहे.
advertisement
महिला नेत्याचा तो CCTV व्हिडीओ पोलिसांच्या हाती
माझ्याकडे दिव्यशक्ती असून ईशान्येश्वर मंदिरात पूजा केल्यानंतर धक्कादायक निकाल लावून देतो, अशी खात्री भोंदू बाबा खरातने संबंधित महिला नेत्याला दिली. त्यांनीही भोंदू खरातच्या बोलण्यावर भाळून खरातने सांगितलेली पूजा केली. हाच व्हिडीओ विशेष पोलीस पथक अर्थात एसआयटीच्या हाताला लागल्याची माहिती आहे. यापूर्वीही अनेक निवडणुकांशी संबंधित उमेदवारांसाठी भोंदू शरातने अशाच पूजा केल्याची चर्चा नाशिक आणि सिन्नरमध्ये आहे.
advertisement
त्या महिला नेत्याची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी होणार?
भोंदू अशोक खरात याच्याकडे महिला नेत्याने केलेल्या पूजेचा व्हिडीओ विशेष पोलीस पथकाच्या हाती लागला असून त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातच्या कार्यालयात संबंधित नेत्या आणि कुटुंब वारंवार येत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. तसे सीसीटीव्ही फुटेज विशेष पोलीस पथकाच्या हाती लागल्याची माहिती आहे.
advertisement
ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार, फडणवीसांचे सूतोवाच, चाकणकरांचीही चौकशी?
देशभरात चर्चिल्या जाणाऱ्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. या निवेदनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिर आणि शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या देखील शिवनिका ट्रस्टवर होत्या. याचाच अर्थ रूपाली यांचीही एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 9:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लोकसभेचा धक्कादायक निकाल लावून देतो, खरात बाबाचं आश्वासन, महिला नेता भाळली, तो CCTV पोलिसांना मिळाला!








