'आई मुस्लिम होती, पण माझं कुटुंब...' अखेर समीर वानखेडेंनी धर्मावरून ट्रोल करण्यांना दिलं सडेतोड उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sameer Wankhede Religion : समीर वानखेडे यांच्या कामाप्रमाणेच त्यांच्या खाजगी आयुष्याबाबतही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहेत. यावरच समीर वानखेडे यांनी एका मुलाखतीत सडेतोड उत्तरं दिली आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
समीर वानखेडे म्हणाले, "लोकांना माझ्या बाबतीत काहीतरी वेगळंच घडावं असं वाटत होतं. पण सुदैवाने आपल्या देशात संविधान आणि तपास यंत्रणा अजूनही जिवंत आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये 'कास्ट स्क्रूटिनी कमिटी'ने माझ्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी आणि माझं कुटुंब पिढ्यानपिढ्या हिंदू महार आहोत. माझं अख्खं गाव याचा पुरावा आहे."
advertisement
आपल्या पालकांबद्दल वानखेडेंनी सांगितलं, "माझ्या वडिलांनी १९७८ मध्ये प्रेमविवाह केला होता. माझी आई हरियाणातील मुरथलची होती आणि ती एका मुस्लीम कुटुंबात जन्मली होती. यात कोणतंही रॉकेट सायन्स नाही. आई मुस्लीम आणि वडील हिंदू महार, असा माझा कौटुंबिक वारसा आहे. पण काही लोकांना मुद्दाम कॉन्ट्रोव्हर्सी करायची होती, म्हणून त्यांनी माझ्या धर्माचा आणि लग्नाचा मुद्दा उकरून काढला."
advertisement









