advertisement

Stomach Problem : पोट फुगण्याच्या समस्यांवर फलाहाराचा पर्याय, ही चार फळं नक्की खा, पोटाचे त्रास होतील कमी

Last Updated:

पोट फुगणं ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. पोट फुगण्याची अनेक कारणं असू शकतात, ज्यात खाण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, पचनाच्या समस्या किंवा आपल्या दैनंदिन सवयींचा समावेश होतो. जेवणानंतर पोट फुग्यासारखं फुगत असेल, किंवा जास्त न खाताही ते जड आणि अस्वस्थ वाटत असेल तर काही फळांचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो, यामुळे पोटाला आरामही मिळेल.

News18
News18
मुंबई : उष्मा आणि आर्द्रता वाढली की पोटाच्या तक्रारी सुरु होतात. काहींना पोटात जळजळ होते, काहींचं पोट फुगतं तर काहींचं दुखतं.
पोट फुगणं ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. पोट फुगण्याची अनेक कारणं असू शकतात, ज्यात खाण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, पचनाच्या समस्या किंवा आपल्या दैनंदिन सवयींचा समावेश होतो. जेवणानंतर पोट फुग्यासारखं फुगत असेल, किंवा जास्त न खाताही ते जड आणि अस्वस्थ वाटत असेल तर काही फळांचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो, यामुळे पोटाला आरामही मिळेल.
advertisement
अननस: अननस पोटासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेसनुसार, ब्रोमेलेन नावाचं एक एन्झाइम पोटातील प्रथिनं पचवण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे पचनक्रिया सोपी होते, विशेषतः जड किंवा प्रथिनयुक्त जेवणानंतर याची उपयुक्तता अधिक जाणवते. याव्यतिरिक्त, ब्रोमेलेनमुळे पचनमार्गातील सूज कमी करण्यास देखील मदत होते.
advertisement
कीवी: कीवी हे एक लहान फळ पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. त्यात ॲक्टिनिडिन नावाचं एक एन्झाइम असतं, जे प्रथिनं पचवण्यास मदत करतं आणि एकूणच पचनक्रिया सुधारतं. 2021 च्या एका अभ्यासानुसार, कीवीमधे आढळणारे प्रीबायोटिक्स आतडी निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
advertisement
सफरचंद: सफरचंदात चांगल्या प्रमाणात फायबर पेक्टिन असतं. निरोगी पचन आणि आतड्यातील चांगल्या जीवाणूंना यामुळे प्रोत्साहन मिळतं. बद्धकोष्ठता हे पोट फुगण्याचं एक प्रमुख कारण आहे. पेक्टिनमुळे बद्धकोष्ठता कमी होते. पण सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्यानं काही लोकांना गॅस आणि अस्वस्थता जाणवू शकते.
संत्री: संत्रीही पचनासाठी फायदेशीर आहेत. त्यांत पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी याची मदत होते. त्यांमधील व्हिटॅमिन सी मुळे पचनसंस्था निरोगी राहते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stomach Problem : पोट फुगण्याच्या समस्यांवर फलाहाराचा पर्याय, ही चार फळं नक्की खा, पोटाचे त्रास होतील कमी
Next Article
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement