advertisement

15 हजार कोटींना विकत घेतली IPL टीम... कोण आहेत काल सोमानी? राजस्थान रॉयल्सचे नवे मालक!

Last Updated:

आयपीएल 2026 सुरू होण्याआधीच राजस्थान रॉयल्सच्या टीमला नवे मालक मिळाले आहेत. काल सोमानी यांच्या नेतृत्वातल्या ग्रुपने राजस्थान रॉयल्सला 1.63 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 15 हजार कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

15 हजार कोटींना विकत घेतली IPL टीम... कोण आहेत काल सोमानी? राजस्थान रॉयल्सचे नवे मालक!
15 हजार कोटींना विकत घेतली IPL टीम... कोण आहेत काल सोमानी? राजस्थान रॉयल्सचे नवे मालक!
मुंबई : आयपीएल 2026 सुरू होण्याआधीच राजस्थान रॉयल्सच्या टीमला नवे मालक मिळाले आहेत. काल सोमानी यांच्या नेतृत्वातल्या ग्रुपने राजस्थान रॉयल्सला 1.63 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 15 हजार कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. काल सोमानी यांनी वॉलमार्ट आणि हॅम्प या दोन ग्रुपच्या मदतीने राजस्थान रॉयल्सची टीम विकत घेतल्याचं सांगण्यात येत आहे. काल सोमानी यांच्याकडे 2021 पासूनच राजस्थान रॉयल्सची हिस्सेदारी आहे.
काल सोमानी यांनी राजस्थान रॉयल्सची टीम विकत घेतली असली तरी आयपीएल 2026 नंतरच त्यांच्याकडे टीमचा मालकी हक्क जाणार आहे.

कोण आहेत काल सोमानी?

काल सोमानी हे अमेरिका स्थित बिजनेसमन आहेत. काल सोमानी यांना ऍड-टेक, आर्टिफिशियल इंटलिजन्स, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी आणि डेटा प्रायव्हसी या क्षेत्रांमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. काल सोमानी अमेरिकेतील एरिझोना राज्याच्या स्कॉट्सडेल भागात राहतात, तसंच ते अनेक कंपन्यांचे मालकही आहेत, ज्यात Truya.AI चाही समावेश आहे.
advertisement
काल सोमानी यांनी रॉब वॉल्टन यांच्यासह राजस्थानची टीम विकत घेतल्याचं सांगण्यात येत आहे. रॉब वॉल्टन हे वॉलमार्ट फॅमिलीमधून येतात, तसंच ते एनएफएल (नॅशनल फुटबॉल लीग) मधील डेनव्हर ब्रॉन्को टीमचे मालकही आहेत. रॉब वॉल्टन यांची नेट वर्थ तब्बल 110 बिलियन डॉलर आहे. रॉब वॉल्टन हे अमेरिकेच्या क्रीडा क्षेत्रातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
advertisement
काल सोमानी यांनी 2021 साली राजस्थान रॉयल्समध्ये हिस्सेदारी विकत घेतली होती. आता 5 वर्षांनंतर काल सोमानी टीमचे मालक झाले आहेत. काल सोमानी यांना हॅम्प फॅमिलीचंही समर्थन मिळालं आहे. शीला हॅम्प या फोर्ड मोटर कंपनीच्या कुटुंबाच्याही सदस्य आहेत. हॅम्प फॅमिली एनएफएलमध्ये डेट्रॉईट लायन्स टीमची मालक आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
15 हजार कोटींना विकत घेतली IPL टीम... कोण आहेत काल सोमानी? राजस्थान रॉयल्सचे नवे मालक!
Next Article
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement