Mumbai News: मुंबईकरांनो आजपासून 'हा' रस्ता राहणार पुढचे दोन महिने बंद, कसा असेल पर्यायी मार्ग?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबईतील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक पुढच्या दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करू शकता. हा नेमका रस्ता कोणता आहे, जाणून घेऊया...
मुंबई: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील काही प्रमुख रस्ते पुढील दोन महिने बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही मुंबईतील वडाळा किंवा सायन परिसरातून प्रवास करत असाल, तर एकदा ही बातमी आवश्य वाचा. पुढचे दोन महिन्यासाठी वाहतुकीमध्ये बदल केले जाणार आहेत. बीएमसीकडून मोनोरेल पोल क्र. 1 एल- 322 उत्तर वाहिनी ते वडाळा डेपो मोनोरेल स्टेशनपर्यंत सांडपाणी वाहिनीचे काम हाती घेण्यात आलेले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी कोणकोणत्या परिसरातील रस्ते बंद असणार आहेत आणि पर्यायी मार्ग कोणते? याची माहिती बीएमसीकडून देण्यात आलेली आहे.
24 मार्च 2026 ते 22 मे 2026 पर्यंत अँटॉप हिल वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये, महापालिकेकडून मलनिस्सारण पाईपलाईन टप्पा क्र. 3 चे कामकाज हाती घेतले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मोनोरेल पोल क्र. 1 एल- 322 ते वडाळा डेपो मोनोरेल स्टेशनपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मलनिस्सारण पाईपलाईनच्या कामासाठी 25 फूट व्यास आणि 20 फूट खोलीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे एका बाजूला वाहतुकीसाठी 3.25 फूट जागा शिल्लक राहिली आहे, म्हणून वाहतूक सुरू राहिल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. या कारणामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे."
advertisement
वाहतुकीतील बदल 24 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 12:01 वाजल्यापासून सुरू झाली असून 22 मे 2026 पर्यंत मध्यरात्री 12:00 पर्यंत आरटीओ चौक ते वडाळा डेपो मोनोरेल स्थानकापर्यंत उत्तर वाहिनी वाहतूकीसाठी संपूर्ण बंद राहणार असल्याची माहिती आरटीओ विभागाने दिली. आरटीओ चौकापासून वडाळा मोनोरेल स्टेशनपर्यंतचा दक्षिणेकडील रस्ता दोन्ही दिशांकडील रस्ता प्रवाशांसाठी वाहतुकीसाठी खुला राहील. वडाळा डेपो मोनोरेल स्टेशनवर पोहोचल्यानंतर, तुम्हाला इच्छित स्थळी जाण्यासाठी, उपलब्ध असलेल्या पुढील मोकळ्या रस्त्याचा वापर करून मूळ उत्तरेकडील रस्त्यावर परत येऊ शकणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 7:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईकरांनो आजपासून 'हा' रस्ता राहणार पुढचे दोन महिने बंद, कसा असेल पर्यायी मार्ग?









