advertisement

उन्हाळ्यात कोंबड्यांना मिळेल थंडावा, अमरावतीमधील शेतकऱ्याने शोधला देशी जुगाड, Video

Last Updated:

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी या समस्येवर प्रभावी उपाय शोधला आहे. त्यांनी कोंबड्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी कमी खर्चात दोन वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. 

+
News18

News18

अमरावती : विदर्भात उन्हाळा सुरू झाला की तापमान सर्रास 40 अंशांच्या पुढे जाते. या वाढत्या उष्णतेचा परिणाम फक्त माणसांवरच नाही, तर प्राणी आणि पक्ष्यांवरही मोठ्या प्रमाणात होतो. विशेषतः पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा काळ खूपच आव्हानात्मक ठरतो. उष्णतेमुळे कोंबड्यांचा मृत्यू वाढून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी या समस्येवर प्रभावी उपाय शोधला आहे. त्यांनी कोंबड्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी कमी खर्चात दोन वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. रविंद्र मेटकर सांगतात की, त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 1 लाख 80 हजार कोंबड्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात त्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत कठीण होते. यासाठी त्यांनी काही ठिकाणी स्वयंचलित आणि वातानुकूलित यंत्रणा बसवली असली, तरी पत्र्याच्या शेडमध्ये तापमान नियंत्रणासाठी त्यांनी स्वतंत्र उपाययोजना केल्या.
advertisement
यामध्ये त्यांनी टाइमरवर चालणारे फॉगर बसवले आहेत. त्यामुळे ठराविक वेळेनंतर फॉगर सुरू होऊन वातावरणात हलकी पाण्याची फवारणी होते. यामुळे शेडमधील तापमान कमी राहते, पण कोंबड्या पूर्णपणे ओल्या होत नाहीत. याशिवाय, त्यांनी शेडच्या चारही बाजूंना बारदाना लावून त्यावर ठिबकची नळी बसवली आहे. या नळीमधून सतत थेंब-थेंब पाणी झिरपत राहते, त्यामुळे बारदाना ओला राहून परिसरात थंडावा निर्माण होतो. हा प्रयोग अतिशय कमी खर्चात करण्यात आला आहे.
advertisement
या दोन्ही उपायांचा त्यांना चांगला फायदा होत आहे. तापमान नियंत्रणात राहिल्यामुळे कोंबड्यांची तब्येत सुधारते, त्यांचे अन्न सेवन व्यवस्थित होते आणि अंड्यांचे उत्पादनही चांगले मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उष्णतेमुळे होणारा मृत्यूदर कमी झाला आहे.
रविंद्र मेटकर यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरचे तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत गेले तरी या उपायांमुळे शेडमधील तापमान सुमारे 37 अंशांपर्यंत नियंत्रित ठेवता येते. त्यांच्या या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांनाही कमी खर्चात प्रभावी उपाय मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
उन्हाळ्यात कोंबड्यांना मिळेल थंडावा, अमरावतीमधील शेतकऱ्याने शोधला देशी जुगाड, Video
Next Article
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement