advertisement

रोहित पवारांच्या लढ्याला 56 दिवसांनी यश, अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कर्नाटकातून मोठी अपडेट

Last Updated:

अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांच्या लढ्याला अखेर 56 दिवसांनी यश मिळाले आहे.

News18
News18
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताने अनेकांना धक्का बसला. काहींना अजूनही दादा आपल्यात नाहीत हा विचारही पटत नाही. तर दादांचा विमान अपघात हा घातपात असल्याचे अनेकांना वाटते. त्यात आमदार रोहित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले. त्यांनी अपघाताप्रकरणी सादरीकरण करत काही प्रश्नही उपस्थित केले. तर याप्रकरणी तपास यंत्रणांच्या संथ तपासावर ताशेरेही ओढले. आमदार रोहित पवार हे मध्यंतरी दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यापासून तर अनेक विरोधी गोटातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. अखेर रोहित पवारांच्या लढ्याला यश मिळाले तब्बल दीड महिन्यानंतर कर्नाटकात गुन्हा दाखल झाला आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि व्हीएसआर विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करत होते.  मुंबईतील मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अखेर 56 अजित पवार अपघात प्रकरणी कर्नाटकात गुन्हा दाखल झाला असून रोहित पवारांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
advertisement

कुठे गुन्हा दाखल झाला?

कर्नाटकातील बेंगलुरू शहरातील हाय ग्राऊंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी झिरो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या फिर्यादीनुसार, झिरो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ६१, १०३, १०५, १०६ १२५, २३८ आणि ३३६(२) या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलीस न्याय देऊ शकत नाही : रोहित पवार

advertisement
कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे हा एफआयआर पाठविण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.आता त्यानुसार महाराष्ट्रात गुन्हा दाखल होऊन त्यानुसार तपास होणार का, असा प्रश्नही रोहित पवारांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला कर्नाटकातील पोलीस प्रशासन अजितदादांना न्याय देण्यासाठी सरसावत आहे. पण महाराष्ट्रातील पोलीस न्याय देऊ शकत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रोहित पवारांच्या लढ्याला 56 दिवसांनी यश, अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कर्नाटकातून मोठी अपडेट
Next Article
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement