Dombivali: असे शेजारी नको रे बाबा! डोंबिवलीतील उच्चभ्रू सोसायटीमध्ये शेजाऱ्यांमध्ये भंयकर मॅटर, कुत्र्यानेही दिली मालकाला साथ, VIDEO व्हायरल
- Published by:Sachin S
Last Updated:
डोंबिवली पूर्वे भागातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोढा हेवन या सोसायटीत हा प्रकार घडला. या सोसायटीमध्ये योगी कुटुंबातील काही लोक घराच्या मा
डोंबिवली : शेजार धर्म पाळला पाहिजे, असं सोसायटी आणि वस्त्यांमध्ये नेहमी नियम पाळला जात असतो. कारण, पोट भरण्यासाठी गाव खेड्यातून माणसं मुंबई सारख्या शहरात येतात. पण, डोंबिवलीमध्ये शेजारी धर्माच्या नियमाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लोढा सारख्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याच्या अंगावर पाळीव कुत्रा सोडला. कुत्र्याने चावा घेतल्याने दोन जण जखमी झाले आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वे भागातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोढा हेवन या सोसायटीत हा प्रकार घडला. या सोसायटीमध्ये योगी कुटुंबातील काही लोक घराच्या मागे असलेल्या चेंबरची दोन कामगारांच्या मदतीने साफसफाई करीत होते. याच दरम्यान शेजारी राहणाऱ्या तिवारी कुटुंबातील अनुराधा तिवारी, संतोष तिवारी आणि कृतिका तिवारी या ठिकाणी आले. चेंबरची सफाई का करताय? अशी विचारणा केली.
advertisement
डोंबिवलीतील घटना, शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याच्या अंगावर सोडला पाळीव कुत्रा, कुत्र्याने चावा घेतल्याने दोन जण जखमी.. pic.twitter.com/IxJio6EbIL
— VIRALबाबा (@viralmedia70) March 24, 2026
या कारणावरून तिघांनी अंजु योगी यांच्या कुटुंबीयांसोबत वाद घातला. बाचाबाचीचं रुपांतर अचानक हाणामारीमध्ये झालं. तिघांनी अंजू योगी कुटुंबातील तिघांना मारहाण केली. घरातून साफसफाई करणारे झाडू आणि इतर साहित्यांचा वापर करून एकमेकांवर हल्ला केला. एवढंच नाहीतर एकमेकांच्या डोक्यामध्ये दगडाने सुद्धा मारहाण केली.
advertisement
कुत्र्याने दोघांना घेतला चावा
आता दोन्ही शेजाऱ्यांमध्ये सुरू असल्या भांडण पाहून साफसफाई करणारे दोघे कामगार पळून गेले. या दरम्यान तिवारी कुटुंबीयांनी आपल्या पाळीव कुत्रा योगी कुटुंबाच्या अंगावर सोडला. या पाळीव कुत्र्याने मनोज योगी आणि त्यांचा मुलाचा चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्यानं दोघे जखमी झाले आहे. दरम्यान, मनोज योगी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये तीन दिवस हॉस्पिटल उपचार करण्यात आले. तर अंजु योगी आणि त्यांच्या मुलावर सुद्धा उपचार करून सोडण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, योगी कुटुंबानी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी तिवारी कुटुंबातील संतोष तिवारी, अनुराधा तिवारी आणि कृतिका तिवारी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 7:44 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Dombivali: असे शेजारी नको रे बाबा! डोंबिवलीतील उच्चभ्रू सोसायटीमध्ये शेजाऱ्यांमध्ये भंयकर मॅटर, कुत्र्यानेही दिली मालकाला साथ, VIDEO व्हायरल










