VIDEO : नाशिकच्या ढोंगी बाबाने ज्या 'एल्विश हनी'ने ठगवलं, तो खरंच इतका महाग का? पाहा 1800 फूट खोल गुहेत मध कसा काढला जातो
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लैंगिक समस्या घेऊन येणाऱ्या श्रीमंत भाविकांना हा बाबा तुर्कीच्या गुहेतला 'चमत्कारी' मध सांगून 9 लाख रुपये किलो दराने विकत होता. हे उघड झाले. त्यामुळे आता हा मध चर्चेचा विषय ठरला आहे. एल्विश हनी नक्की काय आहे, तो इतका महाग का आणि तो कुठे मिळतो हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
नाशिक : अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या ढोंगी बाबाच्या पापाचा घडा आता भरला आहे. नाशिक पोलिसांनी जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे नेला, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केवळ शोषणच नाही, तर 'शक्तीवर्धक' औषधाच्या नावाखाली त्याने सुशिक्षित लोकांनाही लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या ठगीच्या केंद्रस्थानी आहे जगातील सर्वात महागडा मध 'एल्विश हनी' (Elvish Honey).
लैंगिक समस्या घेऊन येणाऱ्या श्रीमंत भाविकांना हा बाबा तुर्कीच्या गुहेतला 'चमत्कारी' मध सांगून 9 लाख रुपये किलो दराने विकत होता. हे उघड झाले. त्यामुळे आता हा मध चर्चेचा विषय ठरला आहे. एल्विश हनी नक्की काय आहे, तो इतका महाग का आणि तो कुठे मिळतो हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊ आणि हा मध कसा काढला जातो हे देखील व्हिडीओद्वारे काढू.
advertisement
काय आहे 'एल्विश हनी'? जगातील सर्वात महागडा मध
एल्विश हनी हा मूळचा तुर्की (Turkey) देशातील Black Sea भागातील एक दुर्मिळ मध आहे. याला जगातील सर्वात शुद्ध आणि महागडा मध मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत प्रति किलो सुमारे 9 लाख रुपये (सुमारे 10,000 युरो) इतकी आहे.
हा मध इतका महाग का?
हा मध कोणत्याही साध्या पोळ्यातील नसून, तुर्कीच्या आर्टविन शहरातील एका 18,000 मीटर खोल नैसर्गिक गुहेतून काढला जातो.
advertisement
हा मध तयार करण्यासाठी मधमाश्या कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय गुहेतील औषधी वनस्पतींचा वापर करतात. वर्षातून केवळ एकदाच हा मध काढला जातो. ज्यामुळे तो कमी प्रमाणात उपलब्ध असतो, त्यामुळेच या मधाची किंमत महाग आहे.
तुर्की फूड इन्स्टिट्यूट या मधाची प्रयोगशाळेत तपासणी केल्याशिवाय तो बाजारात विकू देत नाही, इतकी याची शुद्धता कडक असते.
advertisement
प्राण पणाला लावून काढला जातो हा मध
एल्विश हनी काढण्याची प्रक्रिया पाहून कोणालाही धक्का बसेल. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती हजारो मधमाश्यांच्या विळख्यात असूनही हा मध काढताना दिसते. जरी या व्यक्तीने सुरक्षा साधने घातलेली असली, तरी 18,000 मीटर खोल गुहेत उतरणे आणि मधमाश्यांच्या डंखाचा धोका पत्करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते.
advertisement
या कष्टांमुळेच याला 'मॅड हनी' (Mad Honey) असेही काही लोक म्हणतात, कारण विशिष्ट वनस्पतींच्या फुलांमुळे यात काही अंशी गुंगी आणणारे औषधी गुणधर्म असतात.
You can see why certain varieties of Honey cost so much. 😮 🐝 pic.twitter.com/JxlGccJo3v
— HOW THINGS WORK (@HowThingsWork_) August 6, 2023
advertisement
बाबाच्या जाळ्यात कोण कोण?
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ अशोक खरातच नाही, तर या रॅकेटमध्ये त्याचे काही साथीदारही सामील होते जे 'एल्विश हनी'च्या नावाखाली मार्केटिंग करायचे. या मधाच्या विक्रीतून आलेला पैसा ट्रस्टच्या नावाखाली फिरवून तो मालमत्ता खरेदीसाठी वापरला जात होता.
एल्विश हनी हे जागतिक स्तरावर एक मौल्यवान औषध असले, तरी त्याचा वापर करून नाशिकमध्ये जो फसवणुकीचा प्रकार घडला आहे, तो अत्यंत गंभीर आहे. कोणत्याही बाबाच्या 'चमत्कारी' औषधावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची शास्त्रीय सत्यता तपासणे गरजेचे आहे, हेच या प्रकरणातून स्पष्ट होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 8:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : नाशिकच्या ढोंगी बाबाने ज्या 'एल्विश हनी'ने ठगवलं, तो खरंच इतका महाग का? पाहा 1800 फूट खोल गुहेत मध कसा काढला जातो







