ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांनो आधी 'हे' वाचा! 1 एप्रिलपासून बदलतोय RBI चा नियम, तुमच्यावर होणार परिणाम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
एप्रिल महिना लवकरच सुरू होणारेय. 1 एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत. यामध्ये ऑनलाइन पेमेंट करण्याविषयीच्या महत्त्वाचा नियमाचा समावेश आहे.
advertisement
सततच्या होणाऱ्या फ्रॉडमुळे आरबीआयने कठोर निर्णय घेतलेय. आता प्रत्येक ऑनलाइन पेमेंटवर टू फॅक्टर व्हेरिफिकेशन अनिवार्य होईल. फक्त एक पासवर्ड किंवा जुना ओटीपी पुरेसा नसेल . सध्या अनेक लोक यूपीआय, क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेटने पेमेंट करताना फक्त ओटीपी टाकून काम करतात. पण 1 एप्रिल 2026 पासून ही पद्धत बदलणारेय.
advertisement
नव्या नियमांनुसार प्रत्येक पेमेंटवर किमान दोन पद्धतींनी व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असेल. यामध्ये एक पद्धत डायनामिक असायला हवी. म्हणजेच मोबाईल पिन, यूपीआय पिन, फिंगरप्रिंट, फेस आयडी (बायोमेट्रिक), डायनामिक ओटीपी, पासवर्ड आणि बायोमेट्रिक इत्यादी. लहान रक्कमेच्या सामान्य पेमेंटवर कमी तपासणी होईल. पण मोठ्या रक्कम किंवा सामान्य पेमेंटवर अतिरिक्त तपासणी होईल. याला रिस्क-बेस्ड ऑथेंटिकेशन म्हणतात.
advertisement
advertisement
advertisement
सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? : फ्रॉड झालं आणि बँक किंवा पेमेंट कंपनीने सुरक्षा नियम फॉलो केले नाही. तर तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही. बँकेला पूर्ण पैसा परत करावा लागेल. यामुळे जबाबदारी आता तुमची नसेल तर बँक किंवा कंपनीची असेल. प्रत्येक पेमेंटवर थोड्या जास्त स्टेप्स कराव्या लागू शकतात. पण हे तुमच्या सुरक्षेसाठी आहे. लहान दुकानदार आणि ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनाही सतर्क राहवं लागेल. यामुळेच बँका, पेटीएम, गूगल पे, फोनपे सारख्या कंपन्यांना आपला सिस्टम अपडेट करावा लागेल. त्यांना नव्या पद्धती फॉलो करव्या लागतील आणि ट्रांझेक्शनवर बारीक नजर ठेवावी लागेल.
advertisement
1 एप्रिल 2026 पर्यंत आपल्या बँक अॅप किंवा यूपीआय अॅपला अपडेट ठेवा. सोबतच बायोमेट्रिक (फिंगर किंवा फेस) ऑन ठेवलं तर पेमेंट सहज होईल. कधीही कोणालाच आपला पीन, ओटीपी किंवा पासवर्ड सांगू नका. संशयास्पद मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नका. आरबीआयचा हेतू डिजिटल पेमेंट सुरक्षित आणि सहज करणे आहे. यामुळे दीर्घ काळात तुमचा पैसा जास्त सुरक्षित राहील.










