advertisement

भारतीय स्वातंत्र्यासाठी इथं व्हायच्या बैठका, पुण्यातील ऐतिहासिक राम मंदिर, तुम्ही पाहिलंय का? Video

Last Updated:

Ram Navami 2026: स्वातंत्र्य चळवळीच्या काळात पुण्यातील या प्रसिद्ध मंदिर परिसरात अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्याचे सांगितले जाते.

+
Ram

Ram Navami 2026: भारतीय स्वातंत्र्यासाठी इथं व्हायच्या बैठका, पुण्यातील ऐतिहासिक राम मंदिर, तुम्ही पाहिलंय का? Video

पुणे : पुणे शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला असून शहरातील अनेक प्राचीन वास्तू, मंदिरे आणि सांस्कृतिक परंपरा आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. अशाच वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बुधवार पेठेतील तुळशीबाग परिसरातील तुळशीबाग राम मंदिर. पेशवेकालीन काळात बांधले गेलेले हे मंदिर सुमारे 250 वर्षांहून अधिक जुने असून पुणेकरांसाठी श्रद्धेचे आणि इतिहासाचे केंद्र मानले जाते.
या मंदिराचे व्यवस्थापन श्री राम जी संस्थान ट्रस्टकडे असून गेल्या सात पिढ्यांपासून तुळशीबाग वाले कुटुंब ही परंपरा जपत आहे. मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती देताना रामदास तुळशीबाग वाले यांनी सांगितले की, नारोआप्पा तुळशीबाग वाले यांनी पेशव्यांच्या परवानगीने ही जागा खरेदी केली होती. त्यानंतर 1761 साली या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. त्या काळात बांधलेले हे मंदिर आजही आपल्या मूळ स्वरूपात उभे आहे, हीच त्याची खास वैशिष्ट्ये मानली जातात.
advertisement
स्वातंत्र्यासाठी बैठका
तुळशीबाग राम मंदिराला धार्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात या मंदिर परिसरात अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्याचे सांगितले जाते. देशभक्त आणि समाजनेते याठिकाणी एकत्र येत असत. विशेष म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक नामवंत व्यक्तींच्या बैठका येथे झाल्या होत्या, ज्यामुळे या मंदिराला इतिहासातील एक वेगळी ओळख मिळाली.
advertisement
कसं आहे मंदिर?
मंदिराच्या वास्तुशैलीकडे पाहिले तर ते पूर्णपणे चुन्याच्या बांधकामातून उभारलेले आहे. पारंपरिक पद्धतीने बांधलेले हे मंदिर त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिरातील मूर्ती देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथे भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मार्बलच्या मूर्ती असून त्या वनवासी रूपातील आहेत. या प्रकारच्या मूर्ती भारतात इतरत्र कुठेही आढळत नाहीत, असे सांगितले जाते. त्यामुळे भाविकांसाठी आणि इतिहास अभ्यासकांसाठी हे मंदिर विशेष आकर्षण ठरते.
advertisement
रामनवमीला उत्सव
तुळशीबाग राम मंदिरात वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः रामनवमीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच सीता नवमी हा उत्सव देखील येथे विशेष पद्धतीने साजरा केला जातो, जो इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतो. या उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
advertisement
आजच्या आधुनिक काळातही पुण्याच्या मध्यवर्ती भागात उभे असलेले तुळशीबाग राम मंदिर शहराच्या इतिहासाची, परंपरेची आणि सांस्कृतिक वारशाची आठवण करून देत आहे. अनेक पिढ्यांपासून जपलेली ही परंपरा आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व यामुळे पुणेकरांच्या मनात या मंदिराला एक विशेष स्थान आहे.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
भारतीय स्वातंत्र्यासाठी इथं व्हायच्या बैठका, पुण्यातील ऐतिहासिक राम मंदिर, तुम्ही पाहिलंय का? Video
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement