advertisement

कॅप्टनचं खरं नाव वेगळंच, ज्यात फेल त्यातच बनवलं करिअर, दहावी नापास अशोक खरात कसा बनला कोट्याधीश?

Last Updated:

Ashok Kharat News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. आता त्याची सगळी कुंडली समोर आली आहे.

कॅप्टनचं खरं नाव वेगळंच, ज्यात फेल त्यातच बनवलं करिअर, दहावी नापास अशोक खरात कसा बनला कोट्याधीश?
कॅप्टनचं खरं नाव वेगळंच, ज्यात फेल त्यातच बनवलं करिअर, दहावी नापास अशोक खरात कसा बनला कोट्याधीश?
Ashok Kharat News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपी विधी करण्याच्या बहाण्याने महिलांना गुंगीचं औषध द्यायचा. यानंतर तो त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. तसेच तसेच तो दुर्मिळ खडे, गंडे, दोरे देऊन कोट्यवधींची फसवणूक करायचा. तसेच तो स्वत:ला मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन असल्याचा दावाही करायचा. पण त्याचे हे सगळे दावे खोटे असल्याचं समोर आलं आहे. तो लहानपणापासूनच घोटाळेबाज असून त्याने स्वत:चं नाव देखील लपवल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.
खरं तर, अशोक खरातने आपण मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी असल्याची थाप मारली होती. त्यामुळे तो नाशिक परिसरात कॅप्टन म्हणून प्रसिद्ध झाला. मात्र प्रत्यक्षात तो मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी नव्हे तर खलाशी असल्याचं समोर आलं आहे. शिवाय तो दहावीत नापासही झाला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय त्याचं खरं नाव अशोक नसून लक्ष्मण असल्याचं समोर आलं आहे. दहावीच्या गुणपत्रिकेवर देखील हेच नाव आहे. यानंतर त्याने गॅझेटच्या माध्यमातून आपलं नाव बदललं असावं, असा संशय आहे.
advertisement

अशोक खरातची सगळी कुंडली

अंकशास्त्राचा आधार घेऊन लोकांचे भविष्य सांगणारा हा भोंदू स्वतः दहावीच्या परीक्षेत गणितात नापास होता. ज्या अंकांच्या जोरावर तो भक्तांना भुलवत होता, त्याच विषयात त्याला केवळ २८ गुण मिळाले होते. खरातचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत त्याने शिक्षण घेतले.
advertisement
शाळेच्या रेकॉर्डनुसार, त्याचे नाव लक्ष्मण एकनाथ खरात असे होते. १ जून १९६५ अशी जन्मतारीख असलेल्या लक्ष्मणने मार्च १९८३ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर १९९५ मध्ये त्याने शाळेतून दाखला काढला आणि गॅझेटद्वारे स्वतःचे नाव अशोक करून घेतले असावे अशी शक्यता आहे. सवंगड्यांशी बोलल्यावर त्याच्या खऱ्या नावाचा उलगडा झाला. कॅप्टन अशोक हाच पूर्वाश्रमीचा लक्ष्मण असल्याचे काही जणांनी सांगितले.
advertisement

दहावीत मिळाले ३५.८६ टक्के गुण

दहावीच्या परीक्षेत खरातला जेमतेम ३५.८६ टक्के गुण मिळाले होते. सहापैकी दोन विषयांत तो अनुत्तीर्ण झाला होता. त्याला गणितात २८ (नापास), इंग्रजीत ३७, मराठीत ३९, विज्ञानात ६२, समाजशास्त्रात ३८ आणि हिंदीत ४७ गुण मिळाले होते. तो दहावीत ७०० पैकी २५१ गुण मिळवण्यात यशस्वी झाला होता. ज्या विषयात तो फेल झाला, पुढे त्याने त्याचविषयात आपलं करिअर घडवलं. अनेकांची लूट करत कोट्यवधींची माया जमवली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
कॅप्टनचं खरं नाव वेगळंच, ज्यात फेल त्यातच बनवलं करिअर, दहावी नापास अशोक खरात कसा बनला कोट्याधीश?
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement