advertisement

'तू मला सोडून दुसऱ्यासोबत...'; निगडीतील कंपनीतून काम करून बाहेर पडली पत्नी, पतीने गेटसमोरच घातला डोक्यात दगड

Last Updated:

रविवारी सायंकाळी फिर्यादी महिला निगडी येथील आपल्या कंपनीतून काम संपवून बाहेर पडली होती. त्याच वेळी तिचा पती तिथे दबा धरून बसला होता.

पतीचा पत्नीवर हल्ला (प्रतिकात्मक फोटो)
पतीचा पत्नीवर हल्ला (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : संशयाचे भूत मानगुटीवर बसलं की कोणतंही नात तुटायला वेळ लागत नाही. अशाच एका प्रकरणात पतीने आपल्या पत्नीला संपवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना निगडी येथे घडली आहे. एका खासगी कंपनीसमोर काम संपवून घरी जाणाऱ्या पत्नीवर पतीने दगडाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (२२ मार्च) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. काही काळापासून त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होते. रविवारी सायंकाळी फिर्यादी महिला निगडी येथील आपल्या कंपनीतून काम संपवून बाहेर पडली होती. त्याच वेळी तिचा पती तिथे दबा धरून बसला होता. पत्नी गेटच्या बाहेर येताच पतीने तिला गाठले आणि रागाच्या भरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
advertisement
पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत, "तू मला सोडून दुसऱ्यासोबत राहतेस, आज तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी दिली. रागाच्या भरात त्याने रस्त्याशेजारी पडलेला एक मोठा दगड उचलला आणि पत्नीला खाली पाडून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक जमा झाल्याने मोठा अनर्थ टळला.
advertisement
जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'तू मला सोडून दुसऱ्यासोबत...'; निगडीतील कंपनीतून काम करून बाहेर पडली पत्नी, पतीने गेटसमोरच घातला डोक्यात दगड
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement