Nashik: अशोक खरात अनेकांचा गुरू, पण त्याचा गुरू कोण? इगतपुरी कनेक्शन समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्याचा घडा आता भरत चालला असून, त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. आता त्याचं इगतपुरी कनेक्शन देखील उघडकीस आलं आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्याचा घडा आता भरत चालला असून, त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुणीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेतात घर बांधण्याआधी आई वडिलांसोबत खरातचा सल्ला घ्यायला गेलं असता खरातने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला. आरोपी खरात सहा महिने तिचं शोषण करत होता, असा आरोपही तिने केला. सातव्या गुन्ह्यामुळे अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्याचे अनेक राजकीय नेते मंडळी, बडे अधिकारी, उद्योगपतीसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. तो अनेकांचा गुरू होता. अनेकजण त्याच्याकडे आध्यात्मिक सल्ला घेण्यासाठी येत होते. पण आता अशोक खरातबाबत नवी माहिती समोर आली आहे. अनेकजण खरातकडे सल्ला घेण्यासाठी येत असले तरी तो सल्ला घेण्यासाठी कुणाकडे जात होता. त्याचा गुरू कोण होता? याची माहिती आता समोर आली आहे. त्याचं इगतपुरी कनेक्शन समोर आल्याने पोलीस प्रशासनाने आता तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली आहेत. मंगळवारी विशेष तपास पथकाने (SIT) इगतपुरी तालुक्यात धाड टाकून कसून चौकशी सुरू केली आहे.
advertisement
इगतपुरी तालुक्यात 'भोंदूगिरी'चे जाळे?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील एका भोंदूबाबाच्या घरी नियमित येत असल्याची माहिती आहे. त्यानुसार तपास पथक गावी सर्वांगीण चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे. इथल्या एका भोंदूबाबाकडून अशोक खरातला गंडे दोरे, अंगठ्या वगैरे पुरवल्या जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच वस्तूंचा वापर करत अशोक खरात अध्यात्माच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
यासह अशोक खरातच्या पैशातून या भोंदूबाबाच्या नावावर इगतपुरी तालुक्यात अनेक गावात आणि नाशिकमधील बऱ्याच ठिकाणी कोट्यवधी रुपयाच्या मालमत्ता घेतल्याचा सुद्धा संशय आहे. इगतपुरी शहर परिसर आणि धरण भागासह पर्यटन क्षेत्रातील गावांत सुद्धा अशोक खरात याने काही जमिनी समर्थकांच्या नावावर घेतल्या असाव्यात अशी चर्चा सुद्धा रंगली आहे. विशेष तपास पथकामार्फत याप्रकरणी भंडाफोड केला जाणार असल्याने इगतपुरी तालुक्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
कोट्यवधींची बेनामी मालमत्ता रडारवर
अशोक खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर या धंद्यातून मोठी माया जमवल्याचेही समोर येत आहे. इगतपुरी शहर, धरण परिसर आणि पर्यटन क्षेत्रातील गावांमध्ये खरातने आपल्या समर्थकांच्या नावावर कोट्यवधींच्या जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. नाशिकसह इगतपुरीतील या बेनामी व्यवहारांची आता विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 8:35 AM IST








