advertisement

Central Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; डोंबिवलीपुढे लोकल आता वेळेत धावणार; पाहा काय बदललं

Last Updated:

Mumbai Local Update : रेल्वेने केलेल्या काही महत्त्वाच्या बदलांमुळे आता लोकल गाड्या वेळेत धावणार आहेत. वळण काढल्याने वेग वाढणार असून प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे.

डोंबिवली स्थानकात झालेल्या बदलांमुळे लोकलचा वेग वाढणार असून आता प्रवाशांचा वेळेत प्रवास होणार
डोंबिवली स्थानकात झालेल्या बदलांमुळे लोकलचा वेग वाढणार असून आता प्रवाशांचा वेळेत प्रवास होणार
डोंबिववी : कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल प्रवांशासाठी एक आनंदाची बातमी आहे. डोंबिवली स्थानकातील एक मोठा अडथळा दूर झाल्याने आता तुमचा प्रवास सुसाट होणार आहे.
डोंबिवली स्थानकात झाले 'हे' महत्त्वाचे बदल
गेल्या शनिवार-रविवारच्या मध्य रेल्वेच्या असलेल्या मेगाब्लॉकच्या वेळीस डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक दिवा बाजूकडील असलेले वळण काढून टाकले आहे. वळणामुळे लोकल ही प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणणे आणि परत कल्याणच्या दिशेने जाण्याच्या वेळेसाठी दीड मिनिट लागत असत. आता या कामामुळे आता डोंबिवली रेल्वे स्थानकातील वळण काढल्याने तो आता कायमसाठी बंद होणार आहे.
advertisement
लोकलचा प्रवास होणार सुसाट
गेल्या काही वर्षापासून सीएसएमटीकडून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या सर्व धिम्या लोकल या डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 'एक ए' वरुन जात होत्या. या लोकल प्लॅटफॉर्म एकवरुन सोडल्या तर त्यासाठी त्या रेल्वे मार्गिकेवरील दिवा दिशेकडील तसेच कल्याण बाजुकडील सांधा जोड वळणाटा फटका हा लोकल जात असताना बसत होता. अशा दोन्ही वळण आणि सांधे जोडीवरुन लोकल धावत असताना साधारण दीड मिनिटांचा वेळ लागत होता.
advertisement
आता ही वेळ कमी करण्यासाठी सीएसएमटीकडून कल्याणच्या दिशेने धावणाऱ्या सर्व लोकल गाड्या या डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक एक वरुनच रेल्वेकडून चालवण्यात जात्य होत्या. मात्र आता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील दोन्ही सांधे जोडल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या लोकल या सुसाट धावणार असून प्रवाशांना आता वेळेवर त्यांच्या स्थानकापर्यंत पोहचता येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Central Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; डोंबिवलीपुढे लोकल आता वेळेत धावणार; पाहा काय बदललं
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement