10 वर्ष रिलेशनशिपमध्ये; पण शेवटी तरुणीचं दुसऱ्याशी लग्न, 50 वर्षाचा 'एक्स बॉयफ्रेंड' थेट घरी गेला अन्...कांड पाहून पुणे हादरलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
त्याने महिलेला कोल्हापूर येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिच्या घरी जाऊनही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
पुणे : काही रिलेशनशिप हे अतिशय त्रासदायक ठरू शकतात. अशीच एक घटना समोर आली आहे. यात लग्नापूर्वीच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ४२ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी ५० वर्षीय संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ब्लॅकमेलिंगचा फास
मिळालेल्या माहितीनुसार, विजय लक्ष्मण गावडे (वय ५०, रा. नन्हे, पुणे) आणि पीडित महिला यांची २००५ मध्ये ओळख झाली होती. २००६ ते २०१७ या कालावधीत त्यांच्यात प्रेमसंबंध होते. यादरम्यान विजयने महिलेसोबतचे काही खासगी क्षण मोबाईलमध्ये चित्रित करून ठेवले होते. लग्नानंतरही या फोटोंचा आणि व्हिडीओंचा वापर करून त्याने महिलेला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
advertisement
पीडितेने वैद्यकीय उपचारासाठी विजयकडून काही रक्कम घेतली होती. तिने व्याजासह सर्व पैशांची परतफेड केली असतानाही, विजयने पुन्हा पैशांची मागणी लावून धरली. पैसे न दिल्यास व्हिडीओ पती आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. याच भीतीपोटी त्याने महिलेला कोल्हापूर येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिच्या घरी जाऊनही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
advertisement
विजयच्या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर धाडस एकवटून तिने १५ मार्च रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विजय गावडेला अटक केली आहे. आरोपी हा बेकायदेशीर सावकारी करत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 7:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
10 वर्ष रिलेशनशिपमध्ये; पण शेवटी तरुणीचं दुसऱ्याशी लग्न, 50 वर्षाचा 'एक्स बॉयफ्रेंड' थेट घरी गेला अन्...कांड पाहून पुणे हादरलं







