advertisement

Banana Storage Tips : केळीचं देठ झाकणं पुरेसं नाही, केळी दीर्घकाळ फ्रेश ठेवायची असेल तर 'ही' ट्रिक वापरा!

Last Updated:

Banana storage hacks : केळी साठवण्यासाठी बऱ्याचदा लोक ती पिशवीमध्ये तशीच ठेवतात. पण त्यामुळं ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते योग्य पद्धतीनं साठवणं गरजेच असतं.

केळी साठवण्याची योग्य पद्धत..
केळी साठवण्याची योग्य पद्धत..
मुंबई : घरात फळं साठवणं कधीकधी त्रासदायक बनतं. त्यातही केली साठवणं आणखीच अवघड. कारण केळी झाकून ठेवली तर ती लवकर पिकते आणि उघडी ठेवली तर त्याभोवती बारीक माशा फिरत राहतात. केळी साठवण्यासाठी बऱ्याचदा लोक ती पिशवीमध्ये तशीच ठेवतात. पण त्यामुळं ती लवकर खराब होण्याची आणि कुजण्याची शक्यता असते. त्यामुळे ते योग्य पद्धतीनं साठवणं गरजेच असतं.
तुमच्या लक्षात आलं असेल की, केळी घरी आणल्यानंतर काही दिवसातच त्यांचा रंग बदलायला लागतो. याचं मुख्य कारण म्हणजे इथिलीन वायू. हा वायू फळं पिकवतो. फळांमध्ये जेव्हा हा वायू जास्त प्रमाणात तयार होतो, तेव्हा केळी लवकर पिकतात आणि खराब होतात. म्हणूनच केळी योग्य पद्धतीनं ठेवावी लागतात. अन्यथा ती लवकर खराब होऊ शकतात.
advertisement
केळी साठवण्याची योग्य पद्धत..
- बलिया जिल्ह्यातील श्री मुरली मनोहर टाऊन पदव्युत्तर महाविद्यालयातील मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक कुमार सिंह यांच्या मते, केळी इतर फळांपासून दूर ठेवायला हवी. सफरचंद, आंबे आणि टोमॅटो यांसारखी फळंदेखील इथिलीन वायू सोडतात. यामुळे केळी लवकर पिकतात. म्हणून केळी कधीही इतर फळांसोबत ठेऊ नये.
advertisement
- तुम्हाला केळी जास्त काळ फ्रेश ठेवायची असेल तर केळी घडापासून वेगळी करा. कारण केळी जेव्हा घडाला एकत्र असतात, इथिलीन वायू वेगाने पसरतो. केळी घडापासून वेगळी केल्याने ही प्रक्रिया मंदावते आणि केळी जास्त काळ ताजी राहतात, लवकर खराब होणार नाहीत.
- तुम्ही केळीचे देठ झाकून ठेऊ शकता. यासाठी तुम्ही प्लास्टिक रॅप किंवा ॲल्युमिनियम फॉइल वापरू शकता. देठातून सर्वात जास्त इथिलीन वायू बाहेर पडतो, त्यामुळे ती झाकून ठेवावी. यामुळे इथिलिनचा प्रभाव कमी होतो आणि केळी लवकर खराब होत नाही.
advertisement
- तुम्ही केळी लटकावून ठेवली तरीही ती फ्रेश आणि चांगली राहतात. कारण जेव्हा केळी लटकवलेली असतात तेव्हा त्यावर दबाव पडत नाही. यामुळे केळीची साल लवकर काळी पडत नाही. उन्हाळ्यासारख्या उष्ण हवामानात ही पद्धत विशेष प्रभावी ठरते.
केळी दीर्घकाळ फ्रेश ठेवायची असेल तर ही चूक टाळा..
काही लोक केळी फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र अशी चूक करू नका. यामुळे फळाचा आतला भाग काही काळ चांगला राहू शकतो. मात्र थंडीमुळे साल लवकर काळी पडते. म्हणून केळी नेहमी फ्रिजबाहेर रूम टेम्परेचरवर ठेवावी. याने केळीची चव आणि गुणवत्ता दोन्ही टाकून राहते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Banana Storage Tips : केळीचं देठ झाकणं पुरेसं नाही, केळी दीर्घकाळ फ्रेश ठेवायची असेल तर 'ही' ट्रिक वापरा!
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement