advertisement

पुण्यात लव्ह जिहादचा संशय, हिंदू संघटनांकडून राडा, पोलिसांनी सांगितली दुसरी बाजू

Last Updated:

पुण्याच्या वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्याच्या वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. येथील एक १८ वर्षीय तरुणी वेगळ्या धर्माच्या तरुणासोबत पळून गेली होती. दोघांनी लग्नही केलं. मात्र यावरून हिंदू संघटना आक्रमक झाली. त्यांनी लव्ह जिहादचा आरोप करत तरुणीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. यावरून पोलीस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सज्ञान आहे. तिचं घराशेजारी राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणासोबत दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती घरातून निघून गेली होती. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता ती २२ मार्च रोजी पोलिसांना सापडली. पण तोपर्यंत तिने संबंधित मुलासोबत मंदिरात लग्न केलं होतं. तसेच तिने आईकडे जाण्यास नकार दिला आणि ती मुलासोबत गेली होती.
advertisement
मंगळवारी तरुणीच्या आईने तिला बोलायचं असल्याचं सांगून घरी बोलावून घेतलं होतं. त्यानुसार पोलिसांनी तिला बोलावून घेतलं. यावेळी आई आणि इतर नातेवाईकांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच पुन्हा घरी येण्यास सांगितलं. मात्र तिने आईकडे जाण्यास नकार दिला. तसेच त्यांच्याकडून आपल्या जीवास धोका असल्याचं तिने सांगितलं आणि मुलाकडेच जायचं असा जबाब दिला.
advertisement
त्यावेळी तिचे नातेवाईक आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यानी पोलीस स्टेशन समोर मुलगी ताब्यात द्या, म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं आहे. मात्र विनाकारण पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी प्रक्षोभक खोट्या पोस्ट व्हायरल करून लोकांना भडकवण्याचं काम काही लोक करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात लव्ह जिहादचा संशय, हिंदू संघटनांकडून राडा, पोलिसांनी सांगितली दुसरी बाजू
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement