advertisement

गॅस जरा जपून वापरा! २५ दिवसांनी नाही तर आता इतक्या दिवसांनी बुक करता येणार LPG सिलिंडर

Last Updated:

लोक तासंतास उभं राहून गॅस सिलिंडर घेत आहेत. तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅस कंपन्यांनी आता सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

News18
News18
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसायला लागल्या आहेत. कुठे इंधनाचा पुरवठा अपुरा पडतोय तर कुठे गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवतो आहे. गॅस सिलिंडरसाठी अक्षरश: भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोक तासंतास उभं राहून गॅस सिलिंडर घेत आहेत. तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅस कंपन्यांनी आता सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
किती दिवसांचं वेटिंग
नव्या नियमांनुसार, ग्राहकांना ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या सिलिंडरसाठी बुकिंग करता येणार नाही. विशेषतः इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी आता बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. ज्या ग्राहकांकडे डबल सिलिंडर कनेक्शन आहे, त्यांना आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान ३५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती. गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्वांना वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
उज्ज्वला लाभार्थी आणि ग्रामीण भागासाठी वेगळे नियम
गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे नियम लावले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढच्या बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. सिंगल सिलिंडर कनेक्शन म्हणजे ज्याच्याकडे एकच गॅस सिलिंडर आहे, ते डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी नवीन बुकिंग करू शकतील. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा नियम अधिक कडक केले आहेत.
advertisement
त्यांना पुढील बुकिंगसाठी ४५ दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य आहे. OTP आणि e-KYC हे महत्त्वाचं असेल. डिलिव्हरीच्या वेळी ओटीपी सांगणं आता बंधनकारक आहे. तसेच, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे बुकिंग रद्द केले जाऊ शकते.
१२ सिलिंडरचा कोटा संपला तर काय?
सरकार एका वर्षात १२ सिलिंडरवर सबसिडी देते. जर एखाद्या ग्राहकाने आपला हा कोटा पूर्ण केला असेल, तर १३ व्या सिलिंडरसाठी त्यांना गॅस कंपनीच्या ॲपवर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या, घरी पाहुणे आले आहेत का किंवा घरात काही कार्य आहे का, अशी माहिती द्यावी लागेल. या माहितीची पडताळणी केल्यानंतरच कंपनी अतिरिक्त सिलिंडर देण्याचा निर्णय घेईल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
गॅस जरा जपून वापरा! २५ दिवसांनी नाही तर आता इतक्या दिवसांनी बुक करता येणार LPG सिलिंडर
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement