advertisement

16,700 कोटी मोजले... आता RCB चं नावही बदलणार? अनन्या बिर्लाने एका वाक्यात विषय संपवला!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या आधीच आरसीबीची ऐतिहासिक किंमतीवर विक्री झाली आहे. तब्बल 1.78 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 16,700 कोटी रुपयांना आदित्य बिर्ला ग्रुपच्या नेतृत्वातल्या समुहाने आरसीबीला विकत घेतलं आहे.

16,700 कोटी मोजले... आता RCB चं नावही बदलणार? अनन्या बिर्लाने एका वाक्यात विषय संपवला!
16,700 कोटी मोजले... आता RCB चं नावही बदलणार? अनन्या बिर्लाने एका वाक्यात विषय संपवला!
मुंबई : आयपीएल 2026 च्या आधीच आरसीबीची ऐतिहासिक किंमतीवर विक्री झाली आहे. तब्बल 1.78 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 16,700 कोटी रुपयांना आदित्य बिर्ला ग्रुपच्या नेतृत्वातल्या समुहाने आरसीबीला विकत घेतलं आहे. आदित्य बिर्ला ग्रुपसोबतच टाईम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेन्चर्स आणि ब्लॅकस्टोन यांनी एकत्रित येऊन आरसीबी विकत घेतली आहे.

टीमचं नाव बदलणार?

आदित्य बिर्ला ग्रुपने टीम विकत घेतली असली तरी टीमची मालकी आयपीएल 2026 नंतर त्यांच्याकडे जाणार आहे. आरसीबीची विक्री झाल्यानंतर आता टीमचं नावही बदललं जाणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला यांनी सोशल मीडियावर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अनन्या बिर्ला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट रिपोस्ट केली आहे, ज्यात टीमचं नाव बदललं जाणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.
advertisement

आर्यमन बिर्ला आरसीबीचे नवे चेयरमन

आदित्य बिर्ला ग्रुपचे डायरेक्टर आर्यमन विक्रम बिर्ला आरसीबीचे नवे चेयरमन होतील, तर टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सत्यन गजवानी व्हाईस चेयरमनच्या भूमिकेत दिसतील. आर्यमन बिर्ला हे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमचा भाग होते, तसंच त्यांनी मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफीही खेळली, पण वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आर्यमन बिर्ला यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2018 साली आयपीएल टीममध्ये असलेल्या आर्यमन बिर्ला यांनी पुढच्या 8 वर्षांमध्ये आयपीएल टीम विकत घेतली आहे.
advertisement

विजय माल्ल्या पहिले मालक

आरसीबी फ्रॅन्चायजी बोली प्रक्रियेमार्फत उद्योजक विजय माल्ल्या यांनी विकत घेतली होती, ज्यात विराट कोहलीला टीममध्ये घेतलं गेलं. विजय माल्ल्या यांच्या युनायटेड स्पिरिट्स कंपनीचं नियंत्रण काही काळानंतर डियाजियोकडे गेलं, त्यानंतर डियाजियोकडे आरसीबीची मालक झाली. आता डियाजियोनेही आरसीबीची विक्री केली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
16,700 कोटी मोजले... आता RCB चं नावही बदलणार? अनन्या बिर्लाने एका वाक्यात विषय संपवला!
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement