advertisement

पेट्रोल पंपांवर रांगा अन् खिशाला झळा! क्रूड ऑइल १०७ डॉलर पार; कोणत्या शहरात महाग झालं पेट्रोल डिझेल?

Last Updated:

इराण अमेरिका तणावामुळे Brent Crude 107 डॉलरवर, WTI 93.65. भारतात पेट्रोल डिझेल महाग, मुंबई पुणे सह अनेक शहरांत दरशतक ओलांडून तुटवडा भीती वाढली.

Petrol Pump
Petrol Pump
इराण विरुद्ध अमेरिका यांच्यात चर्चा सुरू आहेत. युद्धाला विराम लागला असला तरी गेल्या २४ तासांत जागतिक बाजारपेठेत मात्र क्रूड ऑइलच्या दरांमुळे भूकंप येणं बाकी आहे. ब्रेंट क्रूडचा भाव वेगाने वाढत १०७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या या भडक्यामुळे देशांतर्गत बाजारातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून, अनेक शहरांमध्ये आज नवे दर लागू झाले आहेत. विशेष म्हणजे, एका बाजूला दरवाढ होत असतानाच दुसरीकडे पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीनं ग्राहक पेट्रोल पंपांवर भलीमोठी रांग लावून आहेत.
जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड १०७ डॉलरवर पोहोचले असतानाच, डब्लूटीआय क्रूडचा दरही वाढून ९३.६५ डॉलर प्रति बॅरल झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे येत्या काळात इंधन आणखी महाग होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये इंधनाचे दर १०० रुपयांच्या पार गेले आहेत. मुंबईत आज दरात कोणताही बदल झाला नसला तरी इतर जिल्ह्यांमध्ये तफावत दिसून येत आहे:
advertisement
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काय स्थिती?
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पेट्रोल ५ पैशांनी महाग झालं असून ९४.९० रुपयांवर पोहोचले आहे, तर गाझियाबादमध्ये दर किंचित कमी होऊन ९४.७० रुपयांवर आले आहेत. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोलमध्ये ३१ पैशांची कपात झाली असून ते १०५.२३ रुपयांवर आहे.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार मोठ्या महानगरांमध्ये मात्र आज किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. भविष्यात इंधनाचा तुटवडा भासू शकतो, अशी अफवा आणि भीती सोशल मीडियावर पसरली आहे. यामुळे अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर सकाळी ७ वाजल्यापासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सरकारने पुरवठा सुरळीत असल्याचे दावे केले असले तरी, वाढत्या किमती आणि सुट्ट्यांचा काळ यामुळे लोकांमध्ये टेन्शन वाढलं आहे.
advertisement
शहरपेट्रोल (रुपये)डिझेल (रुपये)
मुंबई१०३.५४९०.०३
पुणे१०४.१९९०.७१
नाशिक१०४.७४९१.२५
नागपूर१०४.००९०.५७
कोल्हापूर१०४.४९९१.०४
परभणी१०५.५०९२.०३
सिंधुदुर्ग१०५.५५९२.०८
advertisement
कुणी ड्रम आणेल तर कुणी बाटली!
हे सगळं सुरू असलं तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मात्र पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीनं लोक बाटल्या, ड्रम जे मिळेल ते घेऊन लोक पेट्रोल पंपावर पोहोचले आहेत. पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा जाणवत आहे. असं सगळं असलं तरी कुणालाही सुटे इंधन दिले जाणार नाही असे सक्त नियम पेट्रोल पंपांना देण्यात आले आहेत. इंधन संपणार आहे किंवा इंधन पुरवठा बंद होईल अशी कोणतीही अफवा पसवू नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
advertisement
घरबसल्या एका SMS वर दर तपासा
जर तुम्हाला दररोजच्या किमती जाणून घ्यायच्या असतील, तर आता पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून एक मेसेज करून दर पाहू शकता
Indian Oil: 'RSP <तुमच्या शहराचा कोड>' टाइप करून ९२२४९९२२४९ वर पाठवा.
BPCL: 'RSP' लिहून ९२२३११२२२२ वर पाठवा.
HPCL: 'HP Price' लिहून ९२२२२०११२२ वर पाठवा.
view comments
मराठी बातम्या/मनी/
पेट्रोल पंपांवर रांगा अन् खिशाला झळा! क्रूड ऑइल १०७ डॉलर पार; कोणत्या शहरात महाग झालं पेट्रोल डिझेल?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement