advertisement

हॉस्टेलच्या इमारतीवर चढली; पुण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, शेवटच्या चिठ्ठीत लिहिलेला 'तो' एक शब्द

Last Updated:

सिमरनच्या रूमची झडती घेतली असता, टेबलवर एक सुसाईड नोट मिळून आली आहे. त्यात तिने 'सॉरी' असे नमूद केले आहे

पुण्यातील तरुणीनं आयुष्य संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यातील तरुणीनं आयुष्य संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका तरुण विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने आयुष्य संपवलं. तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून टोकाचं पाऊल उचललं. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात हा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सिमरन दांडगे (वय २१, मूळ रा. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सिमरन वाल्हेकरवाडी येथील एका खासगी वसतीगृहात राहत होती. गुरुवारी सकाळी तिने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून अचानक खाली उडी मारली. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावून आले. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
advertisement
'सॉरी' लिहून संपवलं आयुष्य
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सिमरनच्या रूमची झडती घेतली असता, टेबलवर एक सुसाईड नोट मिळून आली आहे. त्यात तिने 'सॉरी' असे नमूद केले आहे. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे गुढ अद्याप कायम आहे. सिमरनचे कुटुंबीय परभणीला असून, सिमरन पुण्यात हॉस्टेलमध्ये राहायची.
advertisement
पोलीस तपास सुरू
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शैक्षणिक तणाव, वैयक्तिक कारण की अन्य काही, या दिशेने चौकशी सुरू आहे. ऐन उमेदीच्या काळात एका इंजिनिअरिंग विद्यार्थिनीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
हॉस्टेलच्या इमारतीवर चढली; पुण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, शेवटच्या चिठ्ठीत लिहिलेला 'तो' एक शब्द
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement