पुणे हादरलं! अविवाहित तरुणी गरोदर; घरीच प्रसूती, बाळ अन् आईचा मृत्यू, प्रकरण काय?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीचे राहत्या घरीच बाळंतपण झाले. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या गंभीर गुंतागुंतीमुळे आई आणि तिच्या अवघ्या एक दिवसाच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या चिंचवडे नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीचे राहत्या घरीच बाळंतपण झाले. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या गंभीर गुंतागुंतीमुळे आई आणि तिच्या अवघ्या एक दिवसाच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडे नगरमध्ये राहणारी २२ वर्षीय तरुणी अविवाहित असताना गरोदर होती. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तिचे घरीच बाळंतपण झाले. मात्र, कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध नसल्याने प्रसूतीनंतर तरुणीची प्रकृती अचानक खालावली. तिला तातडीने रावेत येथील एका खासगी रुग्णालयात बाळासह दाखल करण्यात आले.
नियतीचा क्रूर घाला
रावेत येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुणीची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणीचा ससूनमध्ये उपचारादरम्यान अंत झाला. दुसरीकडे, रावेत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तिच्या निष्पाप बाळाचाही मृत्यू झाला.
advertisement
हे प्रकरण नेमकं काय आहे आणि तरुणीने हॉस्पिटलमध्ये न जाता घरच्या घरी प्रसूती करण्याचा निर्णय का घेतला, या दिशेने तपास होणं गरजेचं आहे. सामाजिक भीती किंवा इतर कोणत्या दबावामुळे हा टोकाचा निर्णय घेतला गेला का, हे अद्याप समोर आलं नसलं तरी भरवस्तीत घडलेल्या या घटनेने महिलांचे आरोग्य आणि सामाजिक मानसिकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 6:53 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! अविवाहित तरुणी गरोदर; घरीच प्रसूती, बाळ अन् आईचा मृत्यू, प्रकरण काय?









