Curd Kabab : दह्याचे हे टेस्टी कबाब एकदा नक्की ट्राय करा! झटपट बनतील अन जेवणाला आणतील रंगत
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Curd Kabab Recipe In Marathi : दह्याचे कबाब बनवण्याची ही रेसिपी फूड ब्लॉगर मीना यांनी दिलीय. हे कबाब बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि ते घरात असलेल्या साहित्यात तयार करता येतात.
मुंबई : बऱ्याचदा आपल्याला जेवणासोबत एखादी साईड डिश हवी असते. बहुतेकवेळा खिचडीसोबत आपल्याला काहीतरी हवं असतं. अशावेळी हे टेस्टी आणि हेल्दी कबाब तुम्ही बनवू शकता. हे कबाब बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही आणि खूप कमी वेळेत हे कबाब तयार होतील. चला तर मग पाहुयात दह्याचे कबाब कसे बनवायचे.
दह्याचे कबाब बनवण्याची ही रेसिपी फूड ब्लॉगर मीना यांनी दिलीय. हे दह्याचे कबाब बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि ते घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार करता येतात. तुमच्या घरी अचानक पाहुणे आले किंवा छोट्या भुकेसाठी तुम्हाला काही बनवायचं असेल तर हे कबाब बेस्ट आहेत. हे कबाब काही साधे मसाले आणि बटाट्यांपासून बनवलेले हे कबाब खूप चविष्ट लागतात.
advertisement
दह्याचे कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
गृहिणी आणि फूड ब्लॉगर मीना यांनी सांगितलं की, हे कबाब बनवण्यासाठी तुम्हाला एक कप घट्ट दही, दोन उकडलेले बटाटे, अर्धा कप ब्रेडक्रंब, एक लहान बारीक चिरलेला कांदा आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. एक चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळण्यासाठी थोडं तेल लागेल.
advertisement
असे बनवा दह्याचे कबाब..
- सर्वात आधी तुम्हाला घट्ट दही लागेल. घट्ट दह्याचे कबाब व्यवस्थित बनवता येतील. दही पातळ असेल, तर ते एका स्वच्छ सुती कापडात 15-20 मिनिटे लटकावून ठेवा. यामुळे त्यातील जास्तीचं पाणी निघून जाईल.
- दही घट्ट झाल्यावर ते एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. यामुळे कबाबचे मिश्रण गुळगुळीत होईल आणि तळताना कबाब तुटणार नाहीत.
advertisement
- आता उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घट्ट केलेल्या दह्यात मिसळा.
- त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घाला.
- त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
- मिश्रण थोडं घट्ट होण्यासाठी त्यात हळूहळू ब्रेडक्रंब्स घाला. यामुळे कबाब सहज बनवता येतील.
advertisement
- आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन त्यांना गोल किंवा टिक्कीचा आकार द्या.
- यानंतर एक पॅन किंवा तवा गरम करून त्यात थोडे तेल घाला.
- तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर कबाब तळा. ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी पलटत राहा.
हे कबाब 4-5 मिनिटं तळल्यानंतर पूर्णपणे तयार होतील. आता तयार कबाबवर थोडा चाट मसाला पेरा आणि हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा. हे कबाब सर्वांना खूप आवडतील.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 6:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Curd Kabab : दह्याचे हे टेस्टी कबाब एकदा नक्की ट्राय करा! झटपट बनतील अन जेवणाला आणतील रंगत










