advertisement

भारतात बघायला मिळणार का PSL च्या मॅच... कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे Live Streaming?

Last Updated:

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या यंदाच्या मोसमाला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानमधील तणाव आणि वाढत्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएसएलमध्ये यंदा मोठा बदल केला गेला आहे.

भारतात बघायला मिळणार का PSL च्या मॅच... कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे Live Streaming?
भारतात बघायला मिळणार का PSL च्या मॅच... कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे Live Streaming?
मुंबई : पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या यंदाच्या मोसमाला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानमधील तणाव आणि वाढत्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएसएलमध्ये यंदा मोठा बदल केला गेला आहे. पीएसएलचे सामने यंदा प्रेक्षकांशिवाय आणि फक्त दोन शहरांमध्येच होत आहेत. पीएसएलचा पहिला सामना गतविजेत्या लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समन यांच्यात झाला, पण पीएसएलचे सामने भारतात पाहता येणार का नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

पीएसएलचं लाईव्ह स्ट्रीम कुठे?

टॅपमॅड या ऍपवर पीएसएलच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे, पण हा प्लॅटफॉर्म पाकिस्तानी असल्यामुळे त्यावर भारतात बंदी आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातले संबध आणखी ताणले गेले, त्यामुळे पाकिस्तानमधील बरीच ऍप, युट्युब चॅनल आणि वेबसाईटवर भारतात बंदी आणली गेली, त्यामुळे पीएसएलचं प्रेक्षपण भारतात होत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या अंतिम बोली प्रक्रियेदरम्यान भारतासाठीचे ब्रॉडकास्टिंग राईट्स रोखून ठेवल्याची पुष्टी केली होती.
advertisement
पीएसएलच्या मागच्या मोसमात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि फॅनकोडसारख्या प्लॅटफॉर्म्सनी भारतीय प्रेक्षकांसाठी पीएसएलच्या सामन्यांचं प्रक्षेपण दाखवलं होतं, पण या मोसमात पीएसएलसाठी भारतातून कोणताही अधिकृत ब्रॉडकास्टर किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर करारबद्ध करण्यात आलेला नाही, त्यामुळे पीएसएलच्या मॅच भारतामध्ये टीव्हीवर किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार नाहीत.

पीएसएल बंद दाराआड

पीएसएल ही स्पर्धा पहिल्यांदाच 8 टीमची झाली आहे. हैदराबाद किंग्समन आणि रावळपिंडी पिंडीज या दोन टीम पीएसएलमध्ये नव्याने सामील झाल्या आहेत. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेलं इंधन संकट यामुळे पीसीबीने पीएसएलचं आयोजन बंद दाराआड प्रेक्षकांशिवाय करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कराची आणि लाहोर या दोन शहरांमध्येच पीएसएलचे सगळे सामने होणार आहेत.
advertisement
इंधनाची बचत करण्यासाठी पाकिस्तान सरकारने सार्वजनिक हालचालींवर निर्बंध आणले आहेत, त्यामुळे यंदाची पीएसएल प्रेक्षकांशिवाय आणि दोनच शहरांमध्ये होत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारतात बघायला मिळणार का PSL च्या मॅच... कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे Live Streaming?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement