advertisement

Shubman Gill : मला वर्ल्ड कप टीममध्ये घेतलं नाही, पण... गिलची पहिली रिएक्शन, IPL आधी बॉम्ब फोडला!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप टीममधून डच्चू मिळाल्याबद्दल शुभमन गिलने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियातून बाहेर झाल्याबद्दल शुभमन गिलने थेट निशाणा साधला आहे.

मला वर्ल्ड कप टीममध्ये घेतलं नाही, पण... गिलची पहिली रिएक्शन, IPL आधी बॉम्ब फोडला!
मला वर्ल्ड कप टीममध्ये घेतलं नाही, पण... गिलची पहिली रिएक्शन, IPL आधी बॉम्ब फोडला!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारतीय खेळाडू आयपीएल 2026 मध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत, पण त्याआधी टीम इंडियाच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिल याच्या मनातली खदखद बाहेर आली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या टीममधून शुभमन गिलला डच्चू देण्यात आला, याबद्दल गिलला आयपीएल 2026 च्या गुजरात टायटन्सच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.
शुभमन गिल हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही, याबद्दल आपल्याला कोणताही पश्चात्ताप नाही आणि कुणासमोरही माझं कौशल्य सिद्ध करण्याचीही गरज नसल्याचा निशाणा शुभमन गिलने साधला आहे. शुभमन गिलचं हे थेट वक्तव्य नेमकं निवड समिती प्रमुख अजित आगरकर, कोच गौतम गंभीर का कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल आहे? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
advertisement
'मी सातत्याने रन करत आहे. मागच्या तीन ते चार आयपीएल हंगामात मी सर्वाधिक रन केल्या आहेत. बॅटर म्हणून मी चांगली कामगिरी करत आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड न झाल्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला कुणालाही माझं कौशल्य सिद्ध करण्याची गरज नाही', अशी प्रतिक्रिया शुभमन गिलने दिली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गुजरात ट्रॉफी जिंकेल, असा विश्वासही गिलने व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement

गिलला टीम इंडियातून डच्चू

आशिया कपवेळी शुभमन गिलचं भारताच्या टी-20 टीममध्ये कमबॅक झालं, एवढंच नाही तर अक्षर पटेलचं उपकर्णधारपद काढून गिलला देण्यात आलं आणि ओपनर असलेल्या संजूला मिडल ऑर्डरमध्ये टाकून गिलला ओपनिंगला संधी मिळाली, पण गिलला या संधीचं सोनं करता आलं नाही. अखेर टी-20 वर्ल्ड कपच्या आधी गिलला टीमबाहेर करून इशान किशनला संधी देण्यात आली आणि अक्षर पटेलला पुन्हा उपकर्णधार करण्यात आलं.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी धमाकेदार बॅटिंग केली, ज्यामुळे टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. शेवटच्या तिन्ही सामन्यांमध्ये तीन अर्धशतकं करणाऱ्या संजू सॅमसनला टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देऊनही गौरवण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : मला वर्ल्ड कप टीममध्ये घेतलं नाही, पण... गिलची पहिली रिएक्शन, IPL आधी बॉम्ब फोडला!
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement