Baramati : बारामतीच्या पतीचं संताप आणणारं कृत्य, पत्नीसोबत कारमध्ये वाद झाले, तीच SUV घेतली अन्...
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
कार चालवत असताना झालेल्या वादातून पतीने पत्नीला रस्त्यात फेकून दिल्याची आणि तिची निर्घृणपणे हत्या केल्याचं संतापजनक कृत्य केलं आहे.
बारामती : पतीने आपल्या पत्नीला एसयूव्हीखाली चिरडून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार आरोपी पतीने आधी आपल्या पत्नीला एसयूव्हीमधून बाहेर ढकललं आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला तिला मारहाण केली आणि मग तिची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आणि त्याची 28 वर्षीय पत्नी शैला गुरुवारी सकाळी गणगपुरा येथे प्रवास करत होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, बल्लूरगा गावाजवळ या जोडप्यात वाद झाला आणि अक्षयने शैलाला गाडीतून बाहेर ढकलले.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शैला मदतीसाठी याचना करत असताना अक्षय तिला निर्घृणपणे मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. शैलाला मारहाण केल्यानंतर अक्षयने तिच्या अंगावरून एसयूव्ही चालवली.
advertisement
अक्षय आणि शैला यांचं लग्न होऊन चार वर्ष झाली होती आणि हे दोघंही मूळचे बारामतीचे होते, अशी माहिती कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक अड्डुरु श्रीनिवासुलू यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार शैलाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अक्षयला होता आणि या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी आरोपी पती अक्षय याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
पतीने चिरला पत्नीचा गळा
दुसरीकडे कर्नाटकाच्याच कलबुर्गीमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने रस्त्याच्या मधोमध पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. ही घटना कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील बल्लुर्गी गावाजवळ घडली, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली. आरोपी पतीने पत्नीला जबरदस्ती गाडीतून आणलं आणि तिला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलं, यानंतर त्याने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 12:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati : बारामतीच्या पतीचं संताप आणणारं कृत्य, पत्नीसोबत कारमध्ये वाद झाले, तीच SUV घेतली अन्...










