advertisement

Success Story : फलटणच्या बोराटे बंधूंनी लढवली शक्कल! या शेतीतून फक्त ८० दिवसांत झाले लखपती, असं केलं काय?

Last Updated:

Farmer Success Story : फलटण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जनार्दन आणि मनोहर बोराटे या बंधूंनी याच विचारातून ‘मॅक्स’ या कलिंगड जातीची लागवड करून यशस्वी प्रयोग केला आहे.

Farmer Success Story
Farmer Success Story
फलटण : कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. फलटण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जनार्दन आणि मनोहर बोराटे या बंधूंनी याच विचारातून ‘मॅक्स’ या कलिंगड जातीची लागवड करून यशस्वी प्रयोग केला आहे. अवघ्या अर्ध्या एकर क्षेत्रात त्यांनी सुमारे ८० दिवसांत तब्बल १० टन कलिंगड उत्पादन घेत जवळपास दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
मॅक्स जातीची केली लागवड
व्यावसायिक शेतीसाठी ‘मॅक्स’ ही कलिंगडाची जात फायदेशीर मानली जाते. या फळाचा गर गडद लाल, रसाळ आणि अत्यंत गोड असतो. तसेच उत्पादनही भरघोस मिळते. कमी कालावधीत काढणीस येणारे हे पीक असल्याने योग्य नियोजन आणि व्यवस्थापनातून चांगला नफा मिळवता येतो, हे ओळखून बोराटे बंधूंनी डिसेंबरच्या सुरुवातीला अर्ध्या एकरात सुमारे चार हजार रोपांची योग्य अंतर राखून लागवड केली.
advertisement
थेट ग्राहकांपर्यंत पोहोचले
लागवडीपासून ते काढणीपर्यंत खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रण यावर विशेष लक्ष देण्यात आले. परिणामी फेब्रुवारी अखेरीस कलिंगडाची फळे काढणीस तयार झाली. बाजारपेठेत विक्री करण्याऐवजी त्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला.
लोणंद-फलटण मार्गावरील चांदोबाचा लिंब, विठ्ठलवाडी फाटा आणि बडेखान या ठिकाणी तीन स्वतंत्र स्टॉल उभारून त्यांनी स्वतःच विक्री सुरू केली. उन्हाळ्याची चाहूल लागताच कलिंगडाला चांगली मागणी मिळाल्याने दररोज दीड ते दोन टन फळांची विक्री झाली.
advertisement
‘शेतकरी ते थेट ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित विक्रीत त्यांनी २० ते २५ रुपये प्रति किलो दर ठेवला. प्रत्येक कलिंगड साधारण चार ते पाच किलो वजनाचे होते. आठवडाभरात सुमारे १० टन विक्री होऊन त्यांना सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी सुरुवातीला अंदाजे ६० हजार रुपयांचा खर्च झाला होता.
या यशाबद्दल बोलताना जनार्दन बोराटे म्हणाले, “आम्ही नेहमी वेगवेगळी पिके घेतो. मात्र कमी कालावधीत जास्त नफा मिळवण्यासाठी आणि काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने कलिंगडाची लागवड केली. कुटुंबातील सर्वांनी लागवड, काढणी आणि विक्रीपर्यंत मेहनत घेतल्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला.”
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : फलटणच्या बोराटे बंधूंनी लढवली शक्कल! या शेतीतून फक्त ८० दिवसांत झाले लखपती, असं केलं काय?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement