advertisement

'मी महादेव...'! पुण्याच्या महिलेला गुंगीचं औषध द्यायचा; लॉजवर नेत कांड अन् ते व्हिडिओ, वसईच्या भोंदूबाबाचं काळं सत्य

Last Updated:

महिलेच्या धार्मिक ओढीचा फायदा घेत ऋषिकेशने तिला अध्यात्म शिकवण्याचे आमिष दाखवले. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला.

वसईच्या भोंदूबाबाचं कांड समोर
वसईच्या भोंदूबाबाचं कांड समोर
पुणे : खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रात भोंदूबाबांच्या जाचाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. आता स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या एका नराधमाने अध्यात्माच्या नावाखाली एका ३५ वर्षीय महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. "मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस," असे वारंवार सांगून या भोंदूबाबाने महिलेला जाळ्यात अडकवले आणि नंतर तिचे लैंगिक शोषण केले. ऋषिकेश वैद्य असे या स्वयंघोषित गुरुचे नाव आहे. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
फेसबुकवरून मैत्री अन् कांड
पीडित महिला पुण्यातील रहिवासी असून २०२३ मध्ये तिची ओळख ऋषिकेशशी फेसबुकवर झाली होती. महिलेच्या धार्मिक ओढीचा फायदा घेत ऋषिकेशने तिला अध्यात्म शिकवण्याचे आमिष दाखवले. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला. तेथे मांजरी येथील एका लॉजवर नेऊन त्याने महिलेला गुंगीकारक पदार्थ दिला आणि बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला.
advertisement
अश्लील फोटोंचा वापर करून ब्लॅकमेलिंग
या नराधमाने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याच फोटोंच्या जोरावर त्याने मे २०२५ मध्ये तिला वसईतील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधील 'खरात' प्रकरण समोर आल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटली आणि आपल्या पतीला हा सर्व प्रकार सांगितला. या भोंदूने अशाच प्रकारे अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'मी महादेव...'! पुण्याच्या महिलेला गुंगीचं औषध द्यायचा; लॉजवर नेत कांड अन् ते व्हिडिओ, वसईच्या भोंदूबाबाचं काळं सत्य
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement