advertisement

पुण्याच्या जंगलात तरुणीचा सडलेला मृतदेह; प्रियकराचं ते कांड ऐकून सगळ्यांचा उडाला थरकाप, 'प्रेमाचा' भयंकर शेवट

Last Updated:

गेल्या काही काळापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, प्रकाशला आता हे अनैतिक संबंध नको होते, तर मनीषा याला तयार नव्हती

पुण्याच्या जंगलात तरुणीचा सडलेला मृतदेह (प्रतिकात्मक फोटो)
पुण्याच्या जंगलात तरुणीचा सडलेला मृतदेह (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिल्याने एका 25 वर्षीय महिलेची तिच्याच प्रियकराने गळा आवळून हत्या केली. ही धक्कादायक घटना आंबेगाव बुद्रुक येथील भिल्लारवाडी जंगलात उघडकीस आली आहे. मनीषा खम्म दमाई (वय २५, रा. नऱ्हे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिचा प्रियकर प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, रा. हिंजवडी) याला अटक केली आहे. हे दोघेही मूळचे नेपाळचे रहिवासी असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघंही विवाहित होते, तरीही त्यांचे विवाहबाह्य संबंध होते.
प्रकरण नेमकं काय?
आरोपी प्रकाश आणि मनीषा हे दोघेही विवाहित असून त्यांना मुलेही आहेत. गेल्या काही काळापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, प्रकाशला आता हे अनैतिक संबंध नको होते, तर मनीषा याला तयार नव्हती. ती वारंवार प्रकाशचा पिच्छा पुरवत असल्याने त्याने तिला कायमचे संपवण्याचा कट रचला. १८ मार्च रोजी प्रकाशने मनीषाला बोलवून कात्रज बोगद्याजवळील वाडा हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या जंगलात नेले. तिथे तिचा गळा आवळून त्याने खून केला आणि मृतदेह तिथेच टाकून तो पसार झाला.
advertisement
मनीषा बेपत्ता असल्याने तिच्या नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेतली होती. तपासादरम्यान प्रकाश तिखात्री याचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि स्वतः पोलिसांना घटनास्थळी नेले. १० दिवस उलटल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होते, मात्र कपड्यांवरून तिच्या भावाने ओळख पटवली.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या जंगलात तरुणीचा सडलेला मृतदेह; प्रियकराचं ते कांड ऐकून सगळ्यांचा उडाला थरकाप, 'प्रेमाचा' भयंकर शेवट
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement