advertisement

Weather Alert: 'ते' दृश्य दिसलं तर घरीच थांबा! 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर तुफानी संकट, 31 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात मार्चअखेर अवकाळी पाऊस थैमान घालत असल्याचे चित्र आहे. आज 31 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
मार्चअखेर महाराष्ट्रावर अवकाळीचं भयंकर संकट घोंघावत आहे. सोसाट्याचा वारा, विजांसह जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे धोका वाढला आहे. 31 मार्च रोजी ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 13 जिल्ह्यांना ऑरेंज तर 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

2/7
कोकणात मार्चअखेर वारं फिरल्याचं चित्र आहे. उष्ण आणि दमट हवामानासोबत आता वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज ताशी 30-50 किमी वेगवान वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमाल तापमान 34-36 अंशांच्या दरम्यान राहील.

3/7
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्याला अस्मानी संकटाचा धोका जास्त आहे. मंगळवारी या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा घाटभाग, तसेच कोल्हापूरला यलो अलर्ट असेल. या काळात वादळी वारे आणि विजांसह पाऊस आणि गारपिटीचा धोका आहे. तापमान 35-38 अंशांच्या दरम्यान राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस सक्रीय झाला आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगावमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर धुळे आणि नंदुरबारला देखील अवकाळी झोडपणार असून यलो अलर्ट कायम आहे. पुढील काही दिवस संकट कायम असेल.

5/7
मराठवाड्यात देखील अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं चित्र आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित लातूर, नांदेड आणि धाराशिवला यलो अलर्ट कायम आहे. त्यामुळे आज पुन्हा मराठवाड्यावर अवकाळी संकटाचे गाळे ढग दिसतील.

6/7
विदर्भात देखील ताशी 30-50 किमी वेगाने वारे वाहतील. नागपूरसह 7 जिल्ह्यांना पुढील 72 तासांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट आहे. काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील. तर अमरावतीसह काही जिल्ह्यांत उन्हाचे चटके जाणवतील.

7/7
दरम्यान, अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी. तर उकाडा आणि दमट हवामानामुळे सर्वसामान्यांनी हायड्रेशनचे लक्ष द्यावे. विजा आणि वादळी वाऱ्याच्या वेळी बाहेर पडणे टाळावे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement