advertisement

Gold News: सोन्याच्या बाजारात मोठी घडामोड! जे २५ वर्षात घडलं नाही ते आता घडलं, रशियाच्या निर्णयानं बाजारात खळबळ

Last Updated:

Gold News : दिवसेंदिवस युद्धाच्या तीव्रेत वाढ होत आहे. तर, दुसरीकडे सोन्याच्या दरात घसरण होत आहे. डॉलर मजबूत झाल्यानं आणि इतर घडामोडींमुळे युद्ध काळातही सोनं स्वस्त झालं आहे . अशातच आता रशियाच्या एका निर्णयाने सोन्याच्या बाजारात खळबळ उडाली आहे.

जे २५ वर्षात घडलं नाही ते आता घडलं, रशियाच्या एका निर्णयानं सोन्याचे भाव कोसळणार?
जे २५ वर्षात घडलं नाही ते आता घडलं, रशियाच्या एका निर्णयानं सोन्याचे भाव कोसळणार?
मॉस्को: अमेरिका-इस्रायलने इराण विरोधात युद्ध पुकारले असून महिना उलटून गेला आहे. दिवसेंदिवस युद्धाच्या तीव्रेत वाढ होत आहे. तर, दुसरीकडे सोन्याच्या दरात घसरण होत आहे. डॉलर मजबूत झाल्यानं आणि इतर घडामोडींमुळे युद्ध काळातही सोनं स्वस्त झालं आहे . अशातच आता रशियाच्या एका निर्णयाने सोन्याच्या बाजारात खळबळ उडाली आहे. मागील २५ वर्षात जे झालं नाही, तो निर्णय रशियाने घेतला.
युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाला आता चार वर्षे पूर्ण होत असताना, रशियाची आर्थिक स्थिती खालावल्याचे म्हटले जात आहे. २५ वर्षांत पहिल्यांदाच रशियाने आपल्या मध्यवर्ती बँकेच्या राखीव साठ्यातील (Gold Reserve) सोन्याची विक्री सुरू केली आहे. 'bne IntelliNews' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या खळबळजनक खुलासा झाला आहे.

युद्धाचा खर्च अवाढव्य, तिजोरीवर ताण

युक्रेनविरुद्धचे युद्ध लांबल्याने रशियाच्या लष्करी खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. २०२६ च्या संरक्षण बजेटसाठी रशियाने १४.५ ट्रिलियन रुबलची (सुमारे ४० टक्के सरकारी खर्च) तरतूद केली आहे. केवळ करवसुलीतून हा अवाढव्य खर्च भागवणे अशक्य झाल्याने रशियाला आता आपल्या सोन्याच्या साठ्याला हात लावावा लागत आहे. पाश्चात्य देशांनी रशियाच्या तेल आणि वायू विक्रीवर घातलेल्या निर्बंधांमुळे देशाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आटले आहेत, परिणामी २०२५ मध्ये रशियाची वित्तीय तूट ३.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
advertisement

विक्रमी विक्री आणि खालावलेला साठा

नियामक आकडेवारीनुसार, २०२२ ते २०२५ दरम्यान रशियाने १५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि परकीय चलन विकले आहे. २०२६ च्या पहिल्या दोन महिन्यांतच आणखी ३५ अब्ज डॉलर्सच्या सोन्याची विक्री झाली आहे. एकट्या जानेवारीत ३ लाख औंस आणि फेब्रुवारीत २ लाख औंस सोने बाजारात काढण्यात आले.
advertisement

धोरणात मोठा बदल

यापूर्वी रशियाची मध्यवर्ती बँक केवळ कागदोपत्री सोन्याचे हस्तांतरण करत असे. मात्र, आता प्रत्यक्ष सोन्याच्या विटा बाजारात विकल्या जात आहेत. या मोठ्या विक्रीमुळे रशियाचा सुवर्णसाठा गेल्या चार वर्षांतील निचांकी पातळीवर (७४.३ दशलक्ष औंस) आला आहे. युद्धाच्या चौथ्या वर्षात प्रवेश करताना रशियन अर्थव्यवस्थेवर किती प्रचंड दबाव आहे, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
advertisement
रशिया हा जगातील पहिल्या तीन सोनं उत्पादक देशांपैकी आहे आणि त्यांच्याकडे जगातील पहिल्या पाच देशांमधील क्रमांकाचा मोठा सोन्याचा साठा आहे. अशा बलाढ्य देशाने सोने विकायला काढणे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठी घडामोड असल्याचे म्हटले जात आहे. जेव्हा रशियासारखा मोठा खेळाडू बाजारात सोन्याचा पुरवठा वाढवतो, तेव्हा सोन्याच्या किमतीवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचा दर घसरण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold News: सोन्याच्या बाजारात मोठी घडामोड! जे २५ वर्षात घडलं नाही ते आता घडलं, रशियाच्या निर्णयानं बाजारात खळबळ
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement