advertisement

तासाचा प्रवास मिनिटांत, बदलापूर पूर्व-पश्चिम प्रवासाची कोंडी सुटणार, गेमचेंजर प्लॅन काय?

Last Updated:

Badlapur News: सध्या बदलापूर पूर्व-पश्चिम प्रवासासाठी एकमेव उड्डाणपूल असून त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

तासाचा प्रवास मिनिटांत, बदलापुरात गेमचेंजर प्लॅन, पूर्व-पश्चिम प्रवास होणार सोपा
तासाचा प्रवास मिनिटांत, बदलापुरात गेमचेंजर प्लॅन, पूर्व-पश्चिम प्रवास होणार सोपा
ठाणे: बदलापूर पूर्व पश्चिम प्रवास आता सोपा होणार आहे. याबाबत मोठा निर्णय झाला असून कल्याण-कर्जत रेल्वे मार्गावर नवा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रस्त्यावरून हा उड्डाणपूल रेल्वे मार्ग ओलांडून पूर्वेतील औद्योगिक वसाहतीजवळच्या होप पावर हाऊस म्हणजेच बदलापूर कर्जत मार्गावर उतरेल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवासही जलद होईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सध्या बदलापूर पूर्व-पश्चिम प्रवासासाठी एकमेव उड्डाणपूल असून त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. विशेषत: पावसाळ्यात तर या ठिकाणी प्रवाशांची बिकट स्थिती होते. त्यामुळे शहरात नव्या उड्डाणपुलांची मागणी होत होती.
advertisement
सध्या बदलापूरचे प्रवेशद्वार असलेल्या बेलवली येथील शिवमंदिर तलाव ते कार्मेल शाळेपर्यंत उड्डाणपूल उभारला जात आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया देखील पार पडली आहे. हा उड्डाणपूल झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. तसेच त्याचा फायदा अंबरनाथच्या चिखलोली परिसर, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग अशा सर्वांना होईल.
advertisement
...तर कोंडी सुटणार
शिवमंदिर ते कार्मेल शाळा या दरम्यानच्या पुलामुळे काही भागांना फायदा होणार होता. मात्र, बदलापूर पूर्वेतील खरवई, पश्चिमेतील बॅरेज रस्ता परिसरातून प्रवास करण्यासाठी सध्याच्या एकमेव उड्डाणपुलाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी या परिसरात उड्डाणपुलाची मागणी होत होती.
असा होणार नव्या पुलाचा फायदा
सध्या रमेशवाडी, ऋतु वर्ल्ड ते पूर्वेकडील खरवई परिसरात प्रवासासाठी मोठा वळसा घालावा लागतो. चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालत बदलापूर गाव आणि स्थानक परिसरातून पूर्वेला जाते. त्यामुळे रेल्वे आणि बस स्थानक परिसर तसेच उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी होती. नव्या उड्डाणपुलामुळे हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत होईल.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
तासाचा प्रवास मिनिटांत, बदलापूर पूर्व-पश्चिम प्रवासाची कोंडी सुटणार, गेमचेंजर प्लॅन काय?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement