सुप्रसिद्ध मराठमोळे अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची श्रिया ही लेक आहे. श्रियाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची छाप पाडली आहे. तिला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. निखळ सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर श्रियाने चाहत्यांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सध्या इन्स्टाग्रामवर श्रियाचा मुंबईमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री पिंक ट्रम्पेड झाडाच्या खाली उभी राहून एक रील शूट केला आहे. ज्यातील तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
advertisement
साथिया चित्रपटातलं टायटल ट्रॅक बॅकग्राऊंड म्युझिकला लावून अभिनेत्रीने तो रील शेअर केला आहे. व्हाईट अँड पिंक कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस कॅरी करत श्रियाने ही सुंदर रिल शूट केली आहे. इन्स्टाग्रामवर रील शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, "फुले जिथे आहेत तिथे तू मला शोधशील, मुंबईतील विक्रोळीमध्ये बहरलेले पिंक ट्रम्पेड झाडं पाहण्यासाठी गेले होते." 3 लाख 83 हजारांहून अधिक युजर्सने हा व्हिडिओ पाहिला असून 16 हजारांहून अधिक चाहत्यांनी व्हिडिओला लाईक केलेले आहे. सध्या सोशल मिडियासह सर्वत्र पिंक ट्रम्पेड झाडांची जोरदार चर्चा सुरू आहे, त्याचं कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये पिंक ट्रम्पेड झाडांना खूप सुंदर बहार येतो. पिंक ट्रम्पेड झाडांजवळ फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अनेकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
श्रियाच्या कामाविषयी बोलायचे तर, मिर्झापूर वेबसीरीजमधून देशभरामध्ये प्रकाशझोतात आलेल्या स्वीटीचे लाखो चाहते आहेत. श्रिया आता चाहत्यांच्या भेटीला मिर्झापूर चित्रपटातून देखील येणार आहे. अलीकडेच चित्रपटाची शुटिंग संपली आहे.
