Success Story : शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी, उच्चशिक्षित माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, महिन्याची कमाई तर पाहा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
एखादे छोटेसे स्वप्नही मोठ्या व्यवसायात रूपांतरित होऊ शकते, हे नाशिकच्या योगिता आणि वेदांत कराडे या माय-लेकांनी सिद्ध करून दाखवले आहे.
नाशिक: जिद्द आणि कष्टाची जोड असेल, तर एखादे छोटेसे स्वप्नही मोठ्या व्यवसायात रूपांतरित होऊ शकते, हे नाशिकच्या योगिता आणि वेदांत कराडे या माय-लेकांनी सिद्ध करून दाखवले आहे. द डेझर्ट नेशन या स्टार्टअपच्या माध्यमातून या दोघांनी अल्पावधीतच नाशिककरांच्या जिभेवर आपली चव रेंगाळत ठेवली आहे.
शिक्षणाची जोड आणि आवडीला मिळालेली नवी दिशा
योगिता कराडे यांचे शिक्षण बी.एस्सी. (केमिस्ट्री) मध्ये झाले आहे. लग्नापूर्वी त्या एका चांगल्या पगाराच्या नोकरीत कार्यरत होत्या. मात्र, लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली आणि त्या गृहिणी म्हणून स्थिरावल्या. तरीही त्यांच्यातील काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी शांत बसू देत नव्हती.
advertisement
कोरोना काळातील संधी आणि मुलाचा पुढाकार
पाककलेची मनापासून आवड असलेल्या योगिता यांनी कोरोना काळात घरूनच केक बनवून विकण्यास सुरुवात केली. आईच्या हाताला असलेली हीच चव ओळखून, त्यांचा मुलगा वेदांत (जो सध्या डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे) याने व्यावसायिक दृष्टिकोन मांडला. आईला केक बनवण्याचे उत्तम कौशल्य आहे, तर आपण एकत्रितपणे याच क्षेत्रात अधिकृत व्यवसाय का करू नये? या संकल्पनेतून द डेझर्ट नेशनचा जन्म झाला.
advertisement
शून्यातून विश्व निर्माण, 30 ते 40 केक बाऊलची रोजची विक्री
कोणत्याही व्यवसायाची सुरुवात सोपी नसते. वेदांत सांगतो की, सुरुवातीला खूप कमी प्रतिसाद मिळाला होता. मात्र, चव आणि दर्जा टिकवून ठेवल्याने आज चित्र बदलले आहे. सुरुवातीला काही मोजकेच ग्राहक असायचे, पण आज दिवसाला 30 ते 40 केक बाऊलची विक्री सहज होते.
नव्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी प्रवास
उच्च शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या मागे न धावता, आपल्या कौशल्याला व्यवसायाचे रूप देऊन हे माय-लेक आज महिन्याला 70 हजार कमाई करत आहेत. गृहिणी असलेल्या योगिता यांनी वयाच्या एका टप्प्यावर आपले स्वप्न मुलाच्या मदतीने साकार केले, हा प्रवास इतर महिलांसाठी आणि तरुणांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरणारा आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 8:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी, उच्चशिक्षित माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, महिन्याची कमाई तर पाहा







