advertisement

Virat Kohli : वयाच्या 38 व्या वर्षी किंग कोहलीचा जलवा, मोडला पाकिस्तानी खेळाडूचा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Last Updated:
Virat Kohli Break Pakistani batter record : आयपीएल 2026 च्या पहिल्याच मॅचमध्ये विराट कोहलीने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केलाय. आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या मॅचमध्ये कोहलीने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
1/6
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध 202 रन्सचे मोठं टार्गेट चेस करताना कोहलीने पाकिस्तानी खेळाडूचा रेकॉर्ड मोडीत काढला आणि आशियाई क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅटर बनण्याचा मान मिळवला आहे.

2/6
विराटने आता 13,612 रन्सचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या बॅटिंगमधील हे सातत्य पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत. या नव्या रेकॉर्डमुळे कोहली आता टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

3/6
विराटने 8 व्या ओव्हरमध्ये एक धाव घेत शोएब मलिकच्या 13,571 रन्सचा आकडा पार केला. विशेष म्हणजे, मलिकला हा टप्पा गाठण्यासाठी 557 मॅचेस खेळाव्या लागल्या होत्या, तर कोहलीने केवळ 415 व्या टी-20 मॅचमध्येच ही किमया साधली.

4/6
या यादीत ख्रिस गेल 14,562 रन्ससह पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स, डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर यांचा नंबर लागतो. कोहली ज्या वेगाने धावा करत आहे, ते पाहता तो लवकरच या यादीत आणखी वरच्या स्थानावर दिसेल यात शंका नाही.

5/6
आयपीएलच्या इतिहासात चेस करताना 4000 रन्सचा टप्पा पार करणारा कोहली हा जगातील पहिला बॅटर ठरला आहे. मोठ्या मॅचेसमध्ये आणि दबावाच्या परिस्थितीत ज्या प्रकारे विराट खेळतो, त्यामुळे त्याला 'चेस मास्टर' म्हटले जाते.

6/6
दरम्यान, सीझनच्या पहिल्याच मॅचमध्ये अशा प्रकारे मोठा रेकॉर्ड ब्रेक झाल्यामुळे टीमचा आत्मविश्वास वाढलाय. येणाऱ्या मॅचेसमध्येही विराटचा हा फॉर्म असाच कायम राहिल्यास आरसीबीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement