Apple वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! सरकारचा मोठा सिक्योरिटी इशारा, लगेच करा हे काम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतात अॅपलचे प्रोडक्ट वापरणाऱ्यांची संख्या ही खुप जास्त आहे. दरम्यान सरकारने त्यांना एक महत्तावाचा सिक्योरिटी इशारा दिला. सिक्योरिटीमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत.
मुंबई : आपल्या भारत देशात अॅपलचे प्रोडक्ट वापरणाऱ्यांची संख्या ही खुप जास्त आहे. यामुळे अॅपल संबंधित सुचनांकडे अवश्य लक्ष द्या. CERT-In ने अॅप यूझर्ससाठी हाय-सीवेरिटी सिक्योरिटी इशारा जारी केलाय. 26 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या या अॅडव्हायजरीमध्ये सांगितलेय. की, iPhone, iPad, Mac आणि अॅपल Watch सारख्या डिव्हाइसेसमध्ये अनेक हानिकारक त्रुटी आठळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स यूझर्सची संवेदनशील माहिती चोरू शकतात. एवढंच नाही तर ते डिव्हाइसवरही कंट्रोल मिळवू शकता. ज्यामुळे हायबर अटॅकच्या धोक्यात वाढ होऊ शकते.
advertisement
CERT-In नुसार, या कमतरता अॅपलच्या सॉफ्टवेयर आणि ऑपरेटिंग सिस्टमच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उपलब्ध आहे. हल्लेखोर याचा वापर करून हानिकारक कोड चालवू शकतात. सिस्टमची सिक्योरिटी बायपास करू शकतात आणि अॅक्सेसही मिळवू शकतात. यासोबतच या त्रुटींमुळे डेटा लीक होणे, डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक आणि सिस्टम क्रॅश होण्यासारख्या समस्या येऊ शकतात.
advertisement
advertisement
कोणत्या डिव्हाइसला आहे मोठा धोका : या समस्या जुन्या सॉफ्टवेयर व्हर्जनवर चालणाऱ्या डिव्हायसेसमध्ये जास्त दिसतील. यात ios आणि iPadOS चे जुने व्हर्जन, macOS Tahoe, macOS Sequoia, macOS Sonoma, Safari, watchOS, tvOS, visionOS आणि अॅपल Xcode च्या जुन्या व्हर्जनचा समावेश आहे. म्हणजेच आयफोनपासून अॅपल व्हिजन प्रोपर्यंत अनेक डिव्हाइस धोक्यात येऊ शकतात.
advertisement
CERT-In ने आपल्या यूझर्सना सल्लाही दिलाय की, त्यांनी लगेच अॅपल डिव्हायसेस लेटेस्ट सॉफ्टवेयर व्हर्जनमध्ये अपडेट करुन घ्या. यासोबतच फक्त अधिकृत अॅप स्टोअरवरुन अॅप डाउनलोड करा. संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळा आणि आपल्या गरजेच्या डेटाचा नियमित बॅकअप घेत राहा. योग्य वेळी अपडेट इंस्टॉल केल्याने हा धोका टाळता येऊ शकतो.










